शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इको-प्रोच्या स्वच्छतेचा ‘मन की बात’ मध्ये गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:31 IST

शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले.

ठळक मुद्देअभियनास २२९ दिवस पूर्ण : १ मार्च २०१७ ला सुरू झाले अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले. या स्वच्छता अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख करीत कामाचा गौरव केला. ही बाब चंद्रपूर शहरासाठी तसेच इको-प्रो संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.किल्ला स्वच्छता अभियान ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत जिल्हातील ऐतीहासीक वारसा संवर्धनाचा उद्देश समोर ठेवून सुरू करण्यात आलेला आहे. जे आजही नियमीतपणे अविरत सुरू आहे. स्वच्छताच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा जतन केला जावा याकरिता सुध्दा या अभियानाचे महत्व असून अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात कार्य केले गेले पाहीजे, असा उल्लेख सुध्दा केला. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या या अभियानाचे सामूहिकता आणि सातत्यता याचाही उल्लेख केला आहे.सदर किल्ला स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासून नियमीतपणे रोज सकाळी ६ ते १० या वेळेत इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. आज या अभियानाचा २२९ वा दिवस असून आजही सदर अभियान सुरू आहे. या अभीयानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन ५५० वर्ष जुना किल्ला परकोट ११ किमीचा परिसर स्वच्छ केला जात आहे. ११ किमी किल्लाच्या भितींपैकी जवळपास ७ किमी लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकुण ३९ कुण बुरूज पैकी २५ बुरूज स्वच्छ करण्यात आलेले असून ४ मुख्य दरवाजे, ५ खिडक्या पैकी ४ खिडक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी २९ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर किल्लावर स्वच्छता अभियानात स्व:ता श्रमदान करीत सहभागी झाले होते. त्यांनी या अभियानाची माहिती पंतप्रधान कार्यालयास एका पत्राव्दारे कळविली होती. तसेच पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रो च्या शिष्टमंडळानी भेट घेऊन माहिती दिली होती.खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे अभियानातील सहभागी सर्व सदस्याचे मनोबल उंचवले आहेत. ‘मन की बात’ मध्ये इको-प्रोच्या कार्याची दखल म्हणजे संस्थेस मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आहे. यामुळे संस्थेचे काम अधिक जोमाने पुढे नेण्यास आणखी बळ मिळाले आहे.- बंडू धोतरेइको-प्रो संस्थेचे अध्यक्ष