शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा, चालबर्डी ( कों ) परिसरातील शेतजमिनींचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

दोन-दोन एकरांचे विक्रीपत्र : बक्षीस पत्र करण्यासाठी जमीन मालकांची धावपळ सचिन सरपटवार भद्रावती :तालुक्यातील कोंढा व हरदाळा रिठ परिसरात ...

दोन-दोन एकरांचे विक्रीपत्र : बक्षीस पत्र करण्यासाठी जमीन मालकांची धावपळ

सचिन सरपटवार

भद्रावती :तालुक्यातील कोंढा व हरदाळा रिठ परिसरात २५०० हेक्टरमध्ये वेकोलिची सर्वांत मोठी कोळसा खाण सुरू होणार, ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच परिसरातील शेतकऱ्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यासोबतच कोंढा व चालबर्डी (कों) परिसरातील शेतजमिनींचे भाव कडाडले असून, शेतजमिनींच्या किमती प्रति एकर १५ लाखांवर गेल्या आहेत.

‘लोकमत’मध्ये सदर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शेतजमिनीचे घरगुती वाटप, तसेच बक्षीस पत्राचे जवळपास ६९ दस्तऐवज नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय भद्रावती येथे एकाच दिवशी नोंदणीकृत झाले. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात दस्तऐवज नोंदणी झाली नसल्याचे संबंधितांनी सांगितले. जे कास्तकार पहिले शेतजमीन विकण्याच्या मन:स्थितीत होते, ते आता जमीन विकण्याच्या विचारात नाहीत. पूर्वी पाच ते सहा लाख रुपये एकरप्रमाणे शेतजमीन विकायला तयार असलेले शेतकरी आता जमिनीचे भाव १५ लाखाच्या वर सांगत आहेत. वेकोलितील नोकरीसाठी आपल्या मुला-मुली, नातवंडांना २-२ एकरांचे विक्रीपत्र, बक्षीसपत्र करून देत आहेत. वाटणीपत्र, हक्कसोड लेख, बक्षीसपत्र हे दस्तऐवज नोंदणीकृत करीत आहेत, तसेच काही जमिनीची विक्रीसुद्धा झाली आहे. वेकोलि मात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरी न देण्यावर ठाम आहे.

बॉक्स

रॅकेटही सक्रिय

चंद्रपूर, नागपूर व परिसरातील जमिनीचे देवाण-घेवाण करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय झाले असून, चौकशी वाढली आहे. माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटी व भ्रमणध्वनी येण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी कोंढा, चालबर्डी (कों) परिसराच्या शेतजमिनीच्या किमतीबाबत फार मोठी उसळी घेतल्याचे चित्र आहे; परंतु हे सगळे करताना वेकोलिच्या सध्याच्या पॉलिसीबाबत योग्य ती माहिती घेऊन समोरचा निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा अशीसुद्धा चर्चा आहे.

बॉक्स

सरकारी किमत कमीच

कोंढा हरदाळा रिठ, चालबर्डी हा भाग ग्रामीण भागात येत असल्याने परिसरातील शेत जमिनीचे सरकारी रेट तुलनेत कमी आहेत. या परिसरातील शेतजमिनीचा सरकारी रेट प्रति एकर दोन लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती आहे. सरकारी भावाच्या चारपट किंमत वेकोलि कास्तकारांना देण्यास तयार आहे. याचा विचार केल्यास जमीन मालकाला प्रति एकर नऊ लाख साठ हजार रुपये एवढी किंमत वेकोलिकडून मिळू शकते.

नंदोरी हे क्षेत्र प्रभाव क्षेत्र असल्याने या परिसरातील शेतजमिनीची सरकारी किंमत इतर गावांच्या तुलनेत जास्त असून, ती प्रतिएकर तीन लाख साठ हजार रुपये आहे. त्याच्या चार पट किंमत वेकोलि शेतकऱ्यांना देऊ शकते.

वेकोलिच्या जुन्या पॉलिसीत आठ लाख रुपये एकर जमीन व नोकरी, तसेच अनुदान देण्यात येत होते; परंतु आता नोकरी देण्यास वेकोलिचा ठाम नकार असून, नोकरीऐवजी पंचवीस वर्षांपर्यंत तीस हजार रुपये महिना पेन्शन देण्यास वेकोलि तयार आहे.

बॉक्स

परिसरात आहेत ५०० शेतकऱ्यांच्या जमिनी

या परिसरात जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या पाच हजार हेक्‍टर शेतजमिनी आहेत. मुख्य म्हणजे शेतजमिनी उपजावू, तसेच वाहत्या आहेत. चांगल्यापैकी उत्पन्न देणाऱ्या आहेत. ओलित, बागायती, जिराईत, पडीक जमिनींच्या भावाबद्दल काय, हाही प्रश्‍न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.