शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर दारूबंदी विरोधकांचा दबाव

By admin | Updated: May 14, 2016 00:38 IST

विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडीसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर....

चंद्रपूर : विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडीसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर तपासणी करून मद्य नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला शुक्रवारी दिवसभर दारूबंदी विरोधकांच्या दबावाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कधी हो तर कधी नाही असे म्हणत वेळ मारून नेण्याची पाळी या अधिकाऱ्यावर आली. मात्र त्याच्या या मानसिकतेचा हवा तसा लाभ घेण्याचा प्रयत्न दारूबंदी विरोधकांनी करण्याचा प्रयत्न केला.बुधवारी ११ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता डेक्कन ओडीसी पंचतारांकित रेल्वे चंद्रपूरला आली होती. या रेल्वेमध्ये मद्य आणि बिअर बार असून त्याचा वापर होत असल्याचा आरोप करीत शहरातील दारूबंदी विरोधकांच्या पुढाऱ्यांनी काही समर्थकांसह रेल्वे स्टेशनवर धाव घेतली होती. या पंचतारांकित रेल्वेतून मद्य चंद्रपुरात आल्याने दारूबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीही पोलिसात झाल्या होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यापैकी कुणीही अधिकारी शहरात नसल्याने तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यावरून बराच गोंधळ उडाला होता. अखेर फोनाफोनी करून पोलिसात झालेली तक्रार रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित झाल्यावर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर तपासाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक संजय आक्केवार आणि त्यांच्या चमूने डेक्कन ओडीसीच्या रेकॉर्डची तपासणी केली. या तपासणीमध्ये मद्य अथवा आक्षेपार्ह असे काहीच आढळले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर ही रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली होती.या संबंधातील वृत्त शुक्रवारी वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यावर मात्र अनेकांनी संबंधित अधिकाऱ्याला मोबाईलवरून फोन करून भंडावून सोडले. यामुळे वेळ मारून नेण्यासाठी कधी हो तर कधी नाही असे सांगत सुटका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिग करून या प्रकरणाचा हवा तसा लाभ घेण्याचा प्रकार घडला.या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संजय अक्केवार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, केलेल्या तपासणीचा आणि कारवाईचा कोणताही अहवाल वरीष्ठांना देण्याची पद्धत असतेच. त्यानुसार आपण आपल्या वरीष्ठांना तोंडी अहवाल कळविला. वरीष्ठांना अहवाल कळविल्याचे वृत्तपत्रातही प्रकाशित झाले. मात्र नेमके या अहवालावरून आपणास दिवसभर बऱ्याच जणांनी फोन करून विचारणा केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.दरम्यान, डेक्कन ओडीसी चंद्रपुरात येऊन परतीच्या प्रवासाला निघाली असली तरी दारूबंदी विरोधकांना मात्र नवा विषय देऊन गेल्याची प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दारू होती तरीही दिशाभूल - दीपक जयस्वालडेक्कन ओडीसी या रेल्वेमध्ये दारू होती, तरीही ती नसल्याची दिशाभूल अधिकाऱ्यांकडून केली जात आहे, असा आरोप दीपक जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, रेल्वेतून आलेली दारू प्रशासन समजून घेणार नसेल तर उद्या कुणीही ४० चाकाच्या गाडीतून दारू आणली तर प्रशासन कारवाई करणार नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करावी, अन्यथा चुकीचा संदेश जाईल, अशी मागणी त्यांनी केली.