शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या मृत्यूचा अहवाल वरिष्ठांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:22 IST

चिमूर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक पाचमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ढाण्या वाघाला आपला जीव गमवावा लागला होता.

ठळक मुद्देसखोल चौकशीची सर्व स्तरातून मागणी : शव विच्छेदनानंतर कळेल मृत्यूचे कारण

आॅनलाईन लोकमतचिमूर : चिमूर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक पाचमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ढाण्या वाघाला आपला जीव गमवावा लागला होता. या वाघाच्या मृत्यूचा अहवाल चिमूर वन विभागातर्फे वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच कळणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्पापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावरील भान्सुली जंगलात जखमी वाघ पाच दिवस एकाच ठिकाणी ठाण मांडून होता. वन विभागाने वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी दिवसरात्र पहारा देण्यासाठी ठेवले होते. मात्र उपचाराचे अधिकार दिले नाही. त्यामुळे हे कर्मचारी घटनास्थळावर वाघाच्या मृत्यूचे मुक साक्षीदार ठरले.वाघ जखमी असल्याचा अहवाल व फोटो व जखमी वाघावर त्वरित उपचार करण्याची गरज स्थानिक वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे २२ फेबुवारीलाच वर्तविली होती. मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष दिले नाही. आता या सर्व प्रकाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत वाघाचा शवविच्छेदन अहवाल ब्रम्हपुरी विभागीय अधिकाºयांना पाठविला असून शवविच्छेदन अहवालावरुन वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकेल. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट यायला एक ते दोन महिन्यांचा वेळ लागणार असल्याचेही वनपरिक्षेत्र अधिकारी बी.पी. चिवंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वाघाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे आता वन विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे वाघाच्या रक्षणासाठी शासन करोडो रुपये खर्च करीत असताना एका ढाण्या वाघाचा असा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तो दुसरा वाघ गेला कुठे?दोन वाघाच्या झुंजीत ‘येडा अण्णा’ नामक वाघ जखमी झाला होता, असे सांगण्यात येत आहे. तसा प्राथमिक अंदाजही वन विभागाने वर्तविला आहे. वाघाची झुंज झाली असेल तर मग दुसरा वाघही जखमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र वनविभाग अजूनही दुसऱ्या वाघाबाबत उदासीन दिसत आहे. त्याचा कुठेही शोध घेतला जात नसल्याचेच दिसून येत आहे. आता तर वन विभाग त्या दुसºया वाघाचा शोध घेऊन उपचार करेल काय, असा प्रश्न आता वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.