शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडबोरीत बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी शुटर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:01 IST

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे.

ठळक मुद्देगावात रात्रंदिवस गस्त : बिबट्याचा पुन्हा गोºह्यावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे. वनविभागाने गावासभोवताल सहा पिंजरे लावले. परंतु बिबट पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे. त्यामुळे वनविभागाने आता बिबट्याला बेशुद्ध करून स्थानांतरण करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी गडबोरी गावाशेजारी दोन शुटरची तैनात केले आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी तुषार क्रिष्णाजी बोरकर यांच्या गोºह्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावाची लोकसंख्या पाच-सहा हजारांच्या आसपास आहे. गावाभोवताल चार ते पाच बिबट ठाण मांडून आहेत. यातील एका बिबट्याला वनविभागाने पिंजºयात जेरबंद केले आहे. नागरिकांचा बळी घेणारा बिबट व उर्वरित बिबट अजूनही गावपरिसरातच आहे. त्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. आता वनविभागाने बिबट्याला बेशुध्द करून स्थलांतरित करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने वनविभागाचे शार्प शुटर ट्रॅक्यूलायझर गनसह गडबोरी येथे तैनात झाले आहेत. गडबोरी येथे वनविभागाने गस्तीत वाढ केली आहे. तरीही गडबोरी येथील ग्रामस्थ अजूनही बिबट्याच्या दहशतीत वावरत आहे.पिंजºयाला हुलकावणीचवनविभागाने गावपरिसरात सहा पिंजरे लावले आहेत. मात्र बिबट पिंजऱ्याला सातत्याने हुलकावणी देत आहे. ७ जूनला बिबट चक्क पिंजऱ्यावरून उडी मारून गेल्याचे कॅमेºयात कैद झाले. मात्र तो पिंजºयात शिरला नाही. दरम्यान, काल शनिवारी रात्री बिबट पिंजऱ्याजवळ फिरकलाही नाही. फक्त गावाशेजारी बिबट्याची डरकाळी ऐकू येत होती, असे ग्रामस्थ सांगतात.गावातील ५० युवकांची रात्री गस्तगेल्या आठ दिवसापासून वनविभागाची गावात गस्त सुरू आहे. आता वनविभागाने गावातील ५० युवकांचीही मदत घेतली आहे. आता हे युवकही वनकर्मचाऱ्यांसोबत रात्री गस्त घालत आहेत. तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण दलसुद्धा गस्तीवर आहेत.

टॅग्स :leopardबिबट्या