शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीतील शेतजमिनीचा अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:35 IST

वेकोलि सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पामुळे कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झालेल्या बाबापूर, कोलगाव, सास्ती गावांना संरक्षण देण्याकरिता नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करावे़ रस्त्याअभावी शेतीची कास्त करण्यास अशक्य झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाकडे अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली़

ठळक मुद्देहंसराज अहीर : वेकोलि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वेकोलि सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पामुळे कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झालेल्या बाबापूर, कोलगाव, सास्ती गावांना संरक्षण देण्याकरिता नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करावे़ रस्त्याअभावी शेतीची कास्त करण्यास अशक्य झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाकडे अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली़वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी अरूण मस्की, किसान आघाडीचे राजू घरोटे, मधुकर नरड, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, क्षेत्रिय महाप्रबंधक बी.सी. सिंग, जि.प. सदस्य सुनील उरकुडे, बादल बेले, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, विस्तारक सतिश दांडगे, सचिन डोहे, बंडू बोढे, दिलीप गिरसावळे उपस्थित होते. सास्ती, कोलगाव, बाबापूर, मानोली येथील शेतकºयांनी ना. हंसराज अहीर यांची भेट घेवून वेकोलिच्या ओ. बी. डम्पमुळे शेतात मशागत करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. तहसीलदारांनी या ठिकाणी रस्ता उपलब्ध करणे शक्य नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी ना. अहीर यांनी वेकोलि व्यवस्थापनाने शेतकºयांच्या अडचणीची दखल घेतली़ शेतीची मशागत होत नसल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सेक्शन ४ नोटीफिकेशनकरिता अहवाल सादर करावा़ तसेच मुख्यालयाची मान्यता प्राप्त करून घ्यावी, असे निर्देश क्षेत्रिय महाप्रबंधकांना दिले. वाहिती करण्यास अडचण निर्माण झालेल्या सुमारे १०० एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. अधिग्रहणाशिवाय पर्याय नसताना वेकोलि व्यवस्थापन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने ना. अहीर यांनी यावेळी नापसंती व्यक्त केली. बैठकीमध्ये वेकोलि सास्ती वसाहतीतील समस्या प्रश्नांबाबत चर्चा झाली.