सुधीर मुनगंटीवार : मारोडा येथे चष्मे वाटप कार्यक्रम चंद्रपूर : जिल्ह्यात विकासाचे अनेक कार्यक्रम सुरु करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच आदर्श गावे करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २७ गावे आदर्श गावांसाठी निवडण्यात आली आहे. मारोडा गावाच्या सर्वागिण विकासासाठी विकास आराखडा करून कामे करू, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील मारोडा येथे नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना पालकमंत्र्यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, गावचे सरपंच मोहुर्ले आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री कन्नमवारांचे मारोडा हे गाव आहे. त्यामुळे कन्नमवारांचे आकर्षक स्मारक लवकरच तयार करण्यात येणार आहे. सदर स्मारकाचे उद्घाटन मूल येथे लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मालगुजारी तलावासाठी दीडशे कोटी मंजूर केले आहे. बंधारे, विहीरींचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. ईलर्निग, डिजीटल शाळा, आदर्श प्राथमिक केंद्रांची कामेही सुरु करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी) अनेकांना मिळाली दृष्टी ४मागील महिन्यात १८२ नेत्र शस्त्रक्रीया करण्यात आल्या. आतापर्यंत ३५ हजार नेत्ररुग्णांना चष्म्याचे वितरण करण्यात आले आहे. पाच हजार ५०० मोतीबिंदुच्या शस्त्रक्रीया झाल्या. त्यामुळे अनेक नेत्रहिन व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. तसेच तीन चाकी सायकल वाटपासह दिव्यांगाना विविध प्रकारची मदत केली जात आहे.
मारोडा गावाच्या विकासासाठी आराखडा तयार करणार
By admin | Updated: December 27, 2016 01:35 IST