शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या निरोपासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:53 IST

१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे.

ठळक मुद्देमिरवणुकीवर नजर : पोलीस, मनपा व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने बाहेर जिल्ह्यातूनही अतिरिक्त कुमक बोलाविली आहे. रामाळा व दाताळा मार्गावरील इरईचे पात्र हे विसर्जनस्थळ असल्याने तिथे विजेची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.२५ आॅगस्ट रोजी मोठ्या उत्साहात जिल्हाभर गणरायाची स्थापना करण्यात आली. चंद्रपूर शहरात शंभराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री ची स्थापना केली. यंदा तब्बल १२ दिवस लाडका गणराया नागरिकांच्या घरोघरी व वॉर्डावॉर्डात असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण पसरले होते. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. यावेळी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. दाताळा मार्गावरील इरई नदीचे पात्र व रामाळा तलाव हे चंद्रपुरातील विसर्जनस्थळ आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या स्थळांची स्वच्छता केली असून त्या ठिकाणी कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड व आपातकालीन व्यवस्थेसाठी विसर्जनस्थळीच मंडप उभारले आहे.जिल्हा प्रशासनानेही सर्व तयारी केली असून विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मचानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात व जटपुरा गेटवरून मिरवणुकीतील गणेशमूर्तीवर फुलांचा वर्षाव केला जातो. याचीही तयारी पूर्ण झाली आहे.वाहतुकीत बदलगांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत मुख्य मार्गावरुन निघणाºया मिरवणूकी दरम्यान वाहतुकीची कोंडी होवू नये तसेच मिरवणूक शांततेत व सुव्यवस्थेत होवून रहदारी सुरळीत राहावी, यासाठी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनाने बदल केले आहे. विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीकरिता शहरातील गल्ल्यांचा वापर करावा, जडवाहनांनी शहराच्या बाहेरील मार्गाने वाहतूक करावी, ५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपासून ६ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी पार्किंग स्थळ घोषित केलेल्या ठिकाणीच आपली वाहने उभी करावी, गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूक कार्यक्रमामुळे कस्तुरबा रोड, रामाळा तलाव, प्रियदर्शनी चौक, अंचलेश्वर गेट, बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, जोड देऊळ, मौलाना आझाद गार्डन हे परिसर व यातील चौक नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच चांदा क्लब ग्राउंड, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल नगीनाबाग, सिंधी पंचायत भवन संत केवलराम चौक रामनगर, व्यायाम शाळा ग्राऊंड पठाणपूरा चौक, डीएड कॉलेज ग्राऊंड बाबूपेठ, महाकाली मंदिर ग्राउंड, बागला चौक या ठिकाणी नागरिकांनी आपले वाहने पार्किंग करावेत. तसेच ज्युबली हायस्कुल पटांगण व महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करता येणार आहेत. मात्र मिरवणूक संपल्यानंतरच ही वाहने येथून काढावी लागणार आहेत.असा आहे पोलीस बंदोबस्तपोलीस विभागाने बंदोबस्ताकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रक पथक, नक्षल विरोधी अभियान पथके, २०० गृहरक्षक आणि २०० पोलीस मित्रांनाही सज्ज केले आहे. ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता ध्वनी प्रदूषण प्रतिबंध पथके आवश्यक यंत्रणेसह नेमण्यात आले आहे.यंदा डीजेमुक्त मिरवणूकविसर्जन मिरवणूक म्हटली की डिजेच्या कर्णकर्कश आवाजाचीच छातीत धडकी भरते. मात्र यावर्षीपासून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त दिसणार आहे. या मिरवणुकीत पुन्हा पारंपरिक वाद्यांना स्थान मिळणार आहे.१०६ सीसीटीव्ही कॅमेरेगणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाने शहरात १०६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यातील सर्व सिस्टम अद्यावत करण्यात आली आहे. प्रत्येक चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व ४० हॅन्डीकॅमेराद्वारे मिरवणुकीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. यासोबतच ११ हायटेक कॅमेरेही सज्ज असून ड्रोन कॅमेराद्वारे अतिसुक्ष्म निगरानी ठेवली जाणार आहे.