शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मस्टर तयार करुन रकमेची उचल

By admin | Updated: April 26, 2017 00:44 IST

गावातील गुराखी व इतर नागरिकांचे म.ग्रा.रो. हमीच्या कामावर गेल्याचे खोटे व बनावट मस्टर तयार करुन सावली तालुक्यातील हिरापूर येथील ...

हिरापूर येथील रोजगार सेवकाचा प्रताप : गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रपूर : गावातील गुराखी व इतर नागरिकांचे म.ग्रा.रो. हमीच्या कामावर गेल्याचे खोटे व बनावट मस्टर तयार करुन सावली तालुक्यातील हिरापूर येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या रोजगार सेवक प्रभाकर गेडेकर याने परस्पर रक्कमेची उचल केली. ही बाब चौकशीअंती स्पष्ट झाली. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवकांकडून रक्कम वसूल करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अतूल कोडापे, अनिल बोहकावार यांनी मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. सावली तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायततंर्गत सन २०१० ते २०१५ या कालावधीत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतंर्गत रस्ता दुतर्फा व वृक्ष लागवड आदी कामे करण्यात आली. या कामात रोजगारसेवकाने गावातील गुराख्यासह अनेकजण कामावर न जातासुद्धा त्याच्या नावे खोटे मस्टर व कागदपत्रे बनवून पैशाची उचल केली. व भ्रष्टाचार केला. त्यामुळे रोजगारसेवकाला पदावरुन काढण्याची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे निवेदन गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, यांना दिले होते. त्यानुसार सावली पंचायत समितीच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यावेळी रोजगार सेवक दोषी आढळून आला. त्यानंतर पंचायत समितीच्या फेरतपासणीच्या अहवालात रोजगार सेवकांकडून ६५ हजार ३८२ रुपये वसूल करण्याचे नमूद करण्यात आले.व अहवालाची प्रत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पाठवली. मात्र अजुनही जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भ्रष्टाचार करणार रोजगार सेवक मोकाट आहे. रोजगार सेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अतूल कोडापे, अनिल बोहकावार यांनी मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. (नगर प्रतिनिधी)