शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेवर डॉक्टरकडून अत्याचार

By admin | Updated: July 13, 2016 01:50 IST

तालुक्यातील शेगाव (बु.) येथील चाळीशी गाठलेल्या एका डॉक्टरने उपचाराकरिता आलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना...

शेगाव येथील घटना : डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्याला अटक वरोरा/शेगाव : तालुक्यातील शेगाव (बु.) येथील चाळीशी गाठलेल्या एका डॉक्टरने उपचाराकरिता आलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. इस्माईल पठाण (४४) असे डॉक्टरचे तर अखिल शेख (२०) रा. शेगाव असे सहायकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, अखिल हा डॉक्टरचा भाचा आहे. शेगाव परिसरातील एक २५ वर्षीय महिला आपल्या पतीसह शेगाव (बु) येथील डॉक्टर इस्माईल पठाण याच्याकडे सोमवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास उपचाराकरिता आली होती. डॉक्टर इस्माईल पठाण याने पीडितेला इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने आतल्या खोलीत नेवून खाटेवर झोपविले. तिच्या पतीला बाहेर थांबायला सांगून दार आतून बंद केले आणि त्या महिलेवर अतिप्रसंग केला. हा प्रकार येथेच थांबला नाही. त्यानंतर डॉक्टरचा सहकारी असलेला त्याचा भाचा अखिल शेख यानेही पीडितेवर अत्याचार केला. घडलेल्या प्रकारामुळे महिला घाबरलेली होती. त्यामुळे लगेच तिने पतीला काहीही सांगितले नाही. मात्र परतीचा प्रवास करीत असताना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या पतीने त्यांच्या नातेवाईकांच्या कानावर ही बाब घातली. नातेवाईकांनी दोघांच्याही मनातील भीती दूर करुन पीडित दाम्पत्याला धीर दिल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेगाव (बु.) येथील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर व त्याच्या सहायकावर भांदवि कलम ३७६ (क) (ड) तसेच अट्रासिटी अक्टनुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)