शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर  जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूगर्भात दुर्मिळ धातूंचा मौल्यवान खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:48 IST

Chandrapur News भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. प्लॅटिनम, सोने आणि रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे संशोधनातून समोर आले.

ठळक मुद्देफटका शासकीय उदासीनतेचा दहा वर्षांपूर्वी संशोधनातून आले समोर जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार

नीलेश झाडे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले. हे दुर्मिळ धातू बाहेर काढण्यासाठी यानंतर काहीही प्रयत्न झाले नाही. हे दुर्मिळ धातू आजही तसेच आहेत. हे धातू बाहेर काढले तर विकासात मैलाचा दगड ठरू शकेल, असा हा खनिजा असल्याचे संशोधकांचे मत आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. यावर एम. एल. डोरा, के. के. के. नायर आणि के. शशिधरण या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या त्रिकुटाने बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान सोने, प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम हे धातू पुरेशा प्रमाणात आढळून आल्याची माहिती समोर आली. जगभरात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातू चंद्रपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गोंडपिपरी तालुक्याच्या पोटात आहेत. ही बाब मागास अशी ओळख असलेल्या गोंडपिपरीसाठी सुखावणारी होती. या संशोधनाने गोंडपिपरीच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले. आता विकासाला नवी चालना मिळेल, अशी आशा या परिसरातील जनतेला होती. मात्र याबाबत शासन यंत्रणेकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने भूगर्भातील हा खजिना तसाच पडून आहे.

वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या संशोधनात गोंडपिपरी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वटराणा पट्ट्यात पाॅयरोझिनाईट आणि गॅब्रो हे प्लॅटिनमचे तर पेंटालँडाईट हे सोन्याचे संयुग आढळून आले. भंगाराम तळोधी परिसरात असलेल्या हेटी पट्ट्यात दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातूचे प्रमाण आढळून आले आहेत. वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक आहे.

एकदा वेधले होते लोकसभेचे लक्ष

हंसराज अहिर यांनी खासदार असताना लोकसभेत याकडे लक्ष वेधून संशोधनकार्य मंदगतीने सुरू आहे. संशोधनाचा निधी वाढवावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर महत्त्वपूर्ण संशोधनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.

टॅग्स :Governmentसरकार