शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सुख-शांतीसाठी केली प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:14 IST

रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

ठळक मुद्देसर्वत्र उत्साह : जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये सामूहिक नमाज अदा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.चंद्रपुरातील पठाणपुरा वार्डातील आलमरी ईदगाह, जनता महाविद्यालयाच्या पटांगणावरील लष्करी ईदगाह व बगड खिडकी परिसरातील शाही गुप्त मशीद परिसरात सकाळी मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहून नमाज अदा केला. यावेळी युवक व लहान मुलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. या ईदगाह परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत होता.जनता महाविद्यालयाच्या पटांगणावरील लष्करी ईदगाह येथे छोटी मस्जिद पब्लिक ट्रस्ट कमिटीच्या वतीने नमाजसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.मौलाना पेश इमाम मुफ्तीवली उल्लाह यांनी सर्व उपस्थित मुस्लीम बांधवांना नमाजसाठी दीक्षा दिली. सकाळी ८.४५ वाजता नमाजला सुरुवात करण्यात आली. ९.३० वाजेपर्यंत येथे नमाज अदा करणे सुरू होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अनवर खान, सचिव साबीर, इनायत तुल्ला, इजहार काझी, बाबाभाई अब्दुल रहमान, हाजी मोहम्मद इकबाल, जहीर काझी, इब्राहीमभाई व कमिटीचे सदस्य उपस्थित होते.एकमेकांना शुभेच्छादरगाह व मशीदमध्ये नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच हिंदू बांधवांनीसुध्दा मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, लष्करी ईदगाह येथे महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.जिल्हाभरात उत्साहचंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी येथेही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भद्रावती येथे नवनिर्वाचित खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनीही मशीदमध्ये जाऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईद