शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’; प्रवाशांना आपल्या समस्या मांडता येणार

By परिमल डोहणे | Updated: July 10, 2024 20:56 IST

लालपरीने प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, या समस्या कुणापुढे मांडायच्या, याबाबत प्रवाशांना अडचण असते...

चंद्रपूर : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत.

लालपरीने प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, या समस्या कुणापुढे मांडायच्या, याबाबत प्रवाशांना अडचण असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही. मात्र, आता प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत. या दिवशी एसटीच्या विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.  

रा. प. कर्मचाऱ्यांसाठी कामगार पालक दिनराज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे आगार पातळीवरच निराकरण करण्याकरिता १५ जुलैपासून चंद्रपूर विभागातील प्रत्येक आगारात सोमवारी कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विभाग नियंत्रक, संबंधित आगार व्यवस्थापक यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी रा. प. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे.  

जिल्ह्यातील चारही आगारांत आळीपाळीने प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते २ या वेळेत प्रवासी राजा दिन तर ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिनाचे आयोजन केले जाणार आहे. तसे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी आपल्या समस्या मांडू शकतात. सूचनाही महामंडळाला देऊ शकणार आहे. समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.-स्मिता सुतवणे, विभाग नियंत्रक, चंद्रपूर

 

टॅग्स :passengerप्रवासी