शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची लेखमाला स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:44 IST

यूपीएससी, एमपीएससी, बँकींग वा तत्सम स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षार्थ्यांना जोराची तयारी करावी लागते, नियमित वाचन करुन त्यांना जून्या व नविन माहितीचे ज्ञान समृद्ध करावे लागते.

ठळक मुद्देविपिन मुद्धा : लोकमतच्या स्पर्धेच्या जगात लेखमालेचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : यूपीएससी, एमपीएससी, बँकींग वा तत्सम स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षार्थ्यांना जोराची तयारी करावी लागते, नियमित वाचन करुन त्यांना जून्या व नविन माहितीचे ज्ञान समृद्ध करावे लागते. याकरिता, त्या संबंधातील पुस्तक-मासिक वाचल्याने फायदा होतोच, सोबतच वर्तमानपत्र नियमित वाचल्याने अधिक फायदा होतो. कारण, पुस्तकांमध्ये साचेबद्ध माहिती असते. तर वर्तमानपत्रातून चालू घडामोडी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांची माहिती मिळत असते. लोकमत’ने बातम्या व लेखासोबतच स्पर्धेच्या जगात ही मालिका सुरु करुन स्तुत्य कार्य हाती घेतले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. असे प्रतिपादन बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी केले.‘लोकमत’ने सुरु केलेल्या ‘स्पर्धेच्या जगता’ या मालिकेचे स्थानिक कला वाणिज्य महिला महाविद्यालयात विमोचन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून मुद्धा बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे उपस्थित होते. मुख्याधिकारी मुद्धा यांनी, तुम्हाला पुढे काय व्हायचे आहे, असा थेट प्रश्न सुरु करुन विद्यार्थिनींना बोलते केले. यावेळी त्यांच्या अभ्यासक्रमापासून तर स्पर्धा परीक्षा कशी द्यायची याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.ध्येय ठेवा, ते प्राप्त करण्याकरिता प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ठेवा, वाचन नियमित करा, वृत्तपत्र वाचाच असा आग्रह त्यांनी विद्यार्थिनींना केला. प्राचार्य शिंदे यांनीही लोकमतने सुरु केलेल्या लेखमालेची प्रशंसा केली, बाल मंच, युवा मंच, सखी मंच आणि आता विद्यार्थ्यांकरिता लोकमतने स्पर्धेच्या जगात हा मंच उभा केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी अतिथी म्हणून विसापूर येथील चिंतामणी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर यांनी केले. संचालन प्रा. प्रमोद घ्यार यांनी तर आभार प्रा. सुहास शिवणकर यांनी मानले.