शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाविरोधात वीज कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 01:12 IST

वीज केंद्रांच्या संभावित खासगीकरणाविरोधात चंद्रपूर येथील वीज कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र : संयुक्त कृती समितीची द्वारसभा चंद्रपूर : वीज केंद्रांच्या संभावित खासगीकरणाविरोधात चंद्रपूर येथील वीज कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला आहे. रस्त्यावर उतरून कर्मचाऱ्यांनी खासगीकरण करण्याच्या धोरणाचा निषेध केला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या उर्जा भवनासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. महानिर्मितीच्या ३० संचापैकी जवळपास १९ वीज केंद्र मोड धोरणानुसार अचानक बंद करण्यात आले आहेत. १९६० साली राज्यात विजेची गरज व प्रादेशिक समतोल राखण्यासाठी राज्यभर वीज केंद्र उभारण्यात आले. समाजोपयोगी उद्योग या उद्देशाने म. रा. विद्युत मंडळाकडे पाहिले जात असे. वीज निर्मितीत महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल राहिलेले आहे. परंतु वीज कायदा २००३ नुसार म. रा. विद्युत मंडळाचे चार कंपन्यामध्ये विभाजन करण्यात आले. या नवीन कायद्यामुळे खुले आर्थिक धोरण स्वीकारून खाजगी व परदेशी कंपन्यांना वीज निर्मितीत परवानगी देण्यात आली. या कायद्यामुळे महावितरणने या खाजगी कंपन्यांसोबत वीजेच्या भविष्यातील मागणीचा विचार न करता पीपीए करण्यात आले. यानुसार सर्वप्रथम महावितरणने महानिर्मिती या शासकीय उपक्रमाची वीज घेण्यासाठी २५ वर्षांचा हमी करार केला. परिणामी विजेची गरज कमी व उत्पादन जास्त झाले. त्यामुळे महावितरणने शासकीय उपक्रमाचे वीज केंद्र बंद करून खाजगी उद्योगांची वीज खरेदीचे धोरण स्वीकारले. शासनाच्या या घातकी धोरणामुळे महानिर्मितीचे पूर्ण क्षमतेने चालणाऱ्या काही विद्युत केंद्राची उपलब्धता असतानाही कमी निर्मिती करण्यास भाग पाडत आहे. तसेच १९ संचांना आरएसडी देण्यात आल्यामुळे अचानक बंद करण्यात आले. खाजगी उद्योग हे मोडच्या मानकात आपले स्थान मिळविण्यासाठी पद्धतशीरपणे वीज दर कमी भासवून उत्पादन करीत आहेत. या धोरणामुळे शासकीय उद्योग बंद पाडून हजारो कर्मचारी, अभियंते, कंत्राटी कामगार, कंत्राटदार, लघु मोठे उद्योजक यांच्यावर उपासमारांची वेळ येणार आहे, असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला. शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही कंपन्यामधील २० संघटना एकत्र येऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या द्वारसभेला सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सहसचिव संभाजी बडगुजर, सुनील मिश्रा, जीईएचे सचिव नवल दामले, बहुजन अधिकारी कर्मचारी संघाचे सरचिटणीस एस.डी. सातकर, पॉवर फ्रन्टचे केंद्रीय सचिव लक्ष्मीकांत कामडे, वर्कस फेडरेशनचे धारकर, वि. क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सचिव विश्वास खुमकर, कामगार सेनेचे जयंत तायडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सभेचे संचालन मनसेचे सचिव नरेंद्र राहाटे व आभार वीज कामगार महासंघाचे संतोष ताजने यांनी मानले. (प्रतिनिधी)