शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष निरीक्षकांपुढे इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: July 21, 2014 00:05 IST

काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचे मिशन सुरू केले आहे. पक्षाचे निरीक्षक नदीम जावेद व प्रदेश काँग्रेसचे समन्वयक संजय दुबे जिल्ह्यात दाखल झाले असून इच्छुक उमेदवारांची कसून चाचपणी करीत आहे.

चंद्रपूर : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचे मिशन सुरू केले आहे. पक्षाचे निरीक्षक नदीम जावेद व प्रदेश काँग्रेसचे समन्वयक संजय दुबे जिल्ह्यात दाखल झाले असून इच्छुक उमेदवारांची कसून चाचपणी करीत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व ब्रह्मपुरीत इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी पक्ष निरीक्षकांपुढे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. चंद्रपुरात आ. नदीम जावेद व संजय दुबे यांनी काँग्रेसच्या सेवादलाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुभाष गौर, विनायक बांगडे उपस्थित होते. यावेळी ११ इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी दावेदारी केली. यावेळी सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले होते. यात अ‍ॅड. प्रमोद आनंद, देवानंद लांडगे, सुधीर गारंगल, केशव रामटेके, संजय रत्नपारखी, महेश मेंढे, चिन्ना नलभोगा, रत्नमाला बावणे, ललित मोटघरे आदींचा समावेश होता. पक्षनिरीक्षकांपुढे सर्वांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मागील २० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. या मतदार संघातून भाजपाला मुक्त करण्यासाठी पक्ष निरीक्षकांनी उमेदवारांची कसून चाचपणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, प्रकाश पाटील मारकवार, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, घनश्याम मुलचंदानी, पंचायत समिती सदस्य अनकेश्वर मेश्राम, डॉ. रजनी हजारे, दिलीप माकोडे, हर्षल चिपळूणकर, प्रमोद बोरीकर, विनोद अहीरकर यांच्यासह १५ जणांनी मुलाखती देत शक्ती प्रदर्शन केले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रासाठी पक्ष निरीक्षकांनी गोसीखुर्द विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, आरमोरी, गडचिरोली, मूल येथील इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह उपस्थित झाले होते. राजेश कांबळे, अशोक भैय्या, देविदास जगनाडे, दिनेश चिटनूरवार, नंदा अल्लूरवार, देवराव भांडेकर, अरविंद जयस्वाल, संचित पोरेड्डीवार, पंकज गुड्डेवार आदींनी पक्ष निरीक्षकांपुढे आपली दावेदारी मांडली. (शहर प्रतिनिधी)