शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

By admin | Updated: May 12, 2016 01:03 IST

बीजीपीपीएल उद्योग चंद्रपूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. उद्योगांना संजीवनी देण्याचे सरकारचे धोरण आहे.

पुगलिया यांची माहिती : पेपरमिल आंदोलनाची सांगताबल्लारपूर : बीजीपीपीएल उद्योग चंद्रपूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. उद्योगांना संजीवनी देण्याचे सरकारचे धोरण आहे. बिल्ट उद्योग कच्चा मालाअभावी बंद पडू देणार नाही. कामगार व व्यापारीवर्गाच्या उपजिविकेसाठी लवकरच उचित निर्णय घेण्याचे व बिल्ट उद्योगाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील चर्चेदरम्यान सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे बल्लारपूर येथील मागील १० दिवसांपासून सुरू असलेले उपोषणाचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया यांनी दिली.बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने जागतिक कामगार दिनापासून स्थानिक नगरपालिकेत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात वनमंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्कारण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारला उपोषणावर बसलेले आष्टी येथील पेपर मिल संघटनेचे पदाधिकारी बी.सी. बॅनर्जी, श्रीधर भगत, बी.एम. खोब्रागडे, मनोज भगत, एस.के. श्रीवास्तव, एस.एस. रॉय, आनंद लांबाडे, डी.एल. झाडे, राजेश धरमाले यांचे उपोषण नरेश पुगलिया यांनी लिंबुपाणी पाजून सोडविले व आंदोलनाची सांगता केली.यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, कोणताही उद्योग वीज, पाणी, कोळसा व कच्चा माल उपलब्ध झाल्याशिवाय चालु शकत नाही. बल्लारपूर पेपर मिलची दर दिवसाची क्षमता हजारावर टन कागदासाठी लागणारा लगदा (पल्प) तयार करण्याची आहे. मात्र कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे हे प्रमाण ७०० टनाच्या आसपास आले आहे. वनमंत्रालयाने विदर्भासाठी बांबू लिलावाची प्रक्रिया दोनदा केली. त्या बिल्ट व्यवस्थापन सहभागी झाले. मात्र एकाच उद्योगाने भाग घेतल्याच्या कारणावरून निविदा प्रक्रिया रद्द केली. परिणामी येथील हजारोवर कामगारांचा जीव टांगणीला लागला होता. बल्लारपूर पेपर मिल उद्योगावर ओढवलेले संकट दूर करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यांनी चर्चेला बोलावून पेपर मिलला लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती नरेश पुगलिया यांनी दिली. यावेळी बी.पी.एम. मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, देवेंद्र आर्य, रामदास वागदरकर, रजनी मुलचंदानी, छबुताई मेश्राम, दिलीप माकोडे आदीे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)