शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

By admin | Updated: May 1, 2017 00:43 IST

ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यापासून सर्वसामान्यांच्या गावपातळीवरील दैनंदिन व्यवहारामध्ये स्वत:ला झोकून देऊन...

सुधीर मुनगंटीवार : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा मेळावाबल्लारपूर : ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यापासून सर्वसामान्यांच्या गावपातळीवरील दैनंदिन व्यवहारामध्ये स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे दिले.चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या विदर्भस्तरीय मेळाव्याला ते संबोधीत करत होते. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द देत असल्याचे त्यांनी सांगितले. ना. मुनगंटीवार यांनी सत्तेबाहेर असतानासुध्दा ग्रामपंचायत कर्मचा-यांसाठी आपण लढा दिल्याची आठवण सांगितली. विधिमंडळात विविध आयुध वापरुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाचा प्रश्न सोडविला. त्यामुळे तुमच्या खात्याचा मंत्री नसलो तरी तुमच्या विषयाचा मी मंत्री आहे. या मागण्यांसदर्भातील लढा मी सुरु केला होता. त्यामुळे तुमची मागणी मान्य करण्यासाठी मंत्रालयात ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगाही काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.बल्लारपूर येथे विदभार्तील ठिकठिकाणावरुन आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्याची मांडणी संघटनेचे अध्यक्ष विलास कुमरवार व सरचिटणीस गिरीष दाभाळकर यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद कर्मचा-यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी, निवृत्ती वेतन मिळावे अशा दोन प्रमुख मागण्या आहेत. या मेळाव्याला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीष शर्मा, पं.स. सभापती गोविंद पोडे, जि.प. सदस्य हरीश गेडाम, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अतिथी पोहोचले उशिराकार्यक्रम दुपारी १ वाजताचा होता. पण, अतिथी सायंकाळ ६ वाजता पोहचले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत होते. त्या येतील व त्या प्रत्यक्ष मागण्याचे निवेदन स्विकारतील व त्यावर त्या बोलतील, अशी उपस्थितांना अपेक्षा होती. त्या न आल्याने कर्मचारी नाराज झालेत. तसे पंकजा मुंडे या बल्लारपुरात येऊन येथील इतर कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. परंतु, मुंबईला जाणे गरजेचे असल्याने आणि विमानाची वेळ झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांच्या या मेळाव्याकडे पाठ फिरविली. दरम्यान, माझा शब्द व आश्वासन ते पंकजा मुंडे यांचे आश्वासन समजा, असे मुनगंटीवार म्हणाले.