शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा विकासाग्रणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:45 IST

आष्टा या गावातील विविध विकासकामांसाठी २५१५ या लेखाशिषाअंतर्गत ५० लाख रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा करीत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच पंचायत समित्यांमध्ये पोंभुर्णा तालुका आणि पंचायत समिती विकासाग्रणी ठरावी यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आष्टा येथे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आष्टा या गावातील विविध विकासकामांसाठी २५१५ या लेखाशिषाअंतर्गत ५० लाख रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा करीत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच पंचायत समित्यांमध्ये पोंभुर्णा तालुका आणि पंचायत समिती विकासाग्रणी ठरावी यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथे जि. प. कृषी विभागातर्फे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, आष्टाचे सरपंच हरीश ढवस, पंचायत समिती सदस्या ज्योती बुरांडे, कृषी अधिकारी उदय पाटील, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे आदीं उपस्थिती होती.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, आष्टा या गावाचा संकल्प करण्यासाठी हरीश ढवस यांच्यासह गावकऱ्यांनी जे प्रयत्न सुरू केले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. या गावानजिक घाटकुळ येथे ५० कोटींचे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी पोंभुर्णा तालुक्यात कार्यरत झाली असून लवकरच मोठा दुग्ध व्यवसाय प्रकल्प, अगरबत्ती प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प याठिकाणी कार्यान्वीत करणार आहोत. तसेच येथील एमआयडीसीला मान्यता मिळाली असून हा तालुका विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ५६ गावांमध्ये एलईडी लाईट, प्रत्येक गावात जलशुध्दीकरण संयंत्र, प्रत्येक गाव शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना बियाणे व डस्टबीन वितरण करण्यात आले.उमेदच्या माध्यमातून मालवाहू गाड्यांचे वितरणपोंभुर्णा पंचायत समितीमध्ये उमेदच्या माध्यमातून मालवाहू गाड्यांचे वितरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आज उपलब्ध झालेली एक गाडी उद्या दहा गाड्यांमध्ये रूपांतरीत व्हाव्या व लाभार्थ्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.