शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण

By admin | Updated: August 8, 2015 01:08 IST

वातावरणातील बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा रिमझिम पाऊस यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे.

पोंभुर्णा : वातावरणातील बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा रिमझिम पाऊस यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे. पोंभुर्णा शहरही या आजाराने ग्रासले आहे. शहरातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.सर्दी, खोकला, थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, कंबरदुखी, मळमळ होणे, डोके दुखणे आदी आजाराचे प्रमाण वाढू लागल्याने पोंभुर्णा तालुक्यातील खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही बाह्यरुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरामध्ये अधुन-मधून पावसाची रिमझिम सुरूच आहे. मात्र तालुक्यातील गावागावांतील स्थानिक स्वराज्य संस्थाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध आजारात वाढ झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास आजार बरे होवू शकतात. हवा आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या होणे, अतिसार यासारख्या आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरून ही बाब दिसून येते. साथीच्या आजाराची लागण सुरू असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी व विहिरींमधील पाणी दूषित झाले आहे. नळाद्वारे त्याच पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजारात वाढ झाली आहे. सध्या पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचे पाऊस पडत असल्याने वातावरणातील बदल व परिसरातील घाणसदृश स्थितीमुळे तालुका परिसरामध्ये डासांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच तालुक्यामध्ये असणारे फायलेरिया कर्मचारी हे परिसरातील नाल्यामध्ये फवारणी करण्याकडे अनेक दिवसांपासून पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे कर्मचारी कोणते काम करतात. त्यांना काम न करता वेतन कसे दिले जाते, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून तालुका परिसरामध्ये फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)