शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रदूषण, वाहतूक कोंडी, महाकाय ढिगाऱ्यांचा वैताग

By admin | Updated: December 9, 2015 01:41 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमधील अतिशय महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र म्हणजे चंद्रपूर विधानसभा. या विधानसभा क्षेत्राला आजवर एकापेक्षा एक सरस आमदार लाभले.

रवी जवळे/गजानन साखरकर चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमधील अतिशय महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र म्हणजे चंद्रपूर विधानसभा. या विधानसभा क्षेत्राला आजवर एकापेक्षा एक सरस आमदार लाभले. मात्र तरीही या विधानसभा क्षेत्राचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. चौफेर विचार न करता केवळ एकाच बाजुचा विचार करण्यात आल्याचे या क्षेत्रातील विकासावरून दिसून येते. कृत्रिम पूर, वेकोलिचे महाकाय ढिगारे, चंद्रपुरातील वाहतूक कोंडी आणि जल व वायू प्रदूषण या समस्या मागील २० वर्षातही सुटू शकल्या नाही, हे या विधानसभा क्षेत्राचे दुदैव.चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट व उमा या नद्या वाहतात. त्यातील वर्धा, इरई व झरपट नदी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून वाहते. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची वक्रदृष्टी या नद्यांवर पडली आहे. या नद्यांमध्ये विष ओतण्याचे काम उद्योग सातत्याने करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे जलस्रोत प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. वर्धा नदी जणू नागरिकांपेक्षा उद्योजकांचेच पोट भरण्यासाठी अस्तित्वात आली असावी, असे एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येते. इरई नदीची अवस्था तर वेकोलि प्रशासनाने बिकट करून टाकली आहे. या नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले. मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. जनतेला दिसणारा हा प्रकार आमदारांना का जाणवू नये ही आश्चर्याची बाब आहे. झरपट नदी पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. या नदीचा डोळ्यादेखत नाला कधी झाला हे लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. झरपटला वाचविण्यासाठी कुण्याही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकाऱ्याने धडपड केली नाही. फोटोसेशनपुरती काही जनप्रतिनिधींना झरपट स्वच्छता अभियानाची जाग येते. बातम्या छापून आल्यावर सारेच सोईस्करपणे विसरून जातात. या नदीत प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी आणि सल्फेट, हेवी मेटल अशा घातक रसायनाचे प्रमाण अधिक आढळून आले, यावरून झरपट नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही, हे स्पष्टच आहे. या नदीच्या तिरावर असलेल्या महाकाली मंदीरात प्रसिद्ध यात्रा भरते. लाखो भाविक येतात, याच नदीत आंघोळ करतात, पाणीही पितात. पण या मार्गावरून दौऱ्यावर जाणाऱ्या स्थानिक आमदारांना गेल्या सहा वर्षात काही करावेसे कधीच वाटले नाही. जलप्रदूषणासोबतच वायू प्रदूषणाचा मोठा विळखा या विधानसभा क्षेत्राला आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी, एमईएल प्लांट, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, रसायनांचे कारखाने या क्षेत्रात आहेत. यातील एकही उद्योग प्रदूषणाच्या नियमांचे पालन करीत नाही. म्हणूनच येथील प्रदूषण देशपातळीवर कुप्रसिध्द झाले आहे. यामुळे चंद्रपूर, दुर्गापूर, पद्मापूर, उर्जानगर, घुग्घुस, ताडाळी यासह अनेक गावात आरोग्याचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे वयोमानच घटले आहे. घुग्घुस परिसरातही समस्याचंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ४५ हजार लोकसंख्या व औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या घुग्घुसमध्येही अनेक समस्या आहेत. राज्य शासनाला सर्वाधिक राजस्व मिळवून देणारे हे क्षेत्र असले तरी घुग्घुसला नगरपंचायतीचा दर्जा अजूनही देण्यात आलेला नाही. ग्रामीण रुग्णालय मंजूर असले तरी नागरिकांच्या सेवेत नाही. नायब तहसील कार्यालय आहे. पण शासकीय मंजुरी नाही. जवळच असलेला मोरवा विमानतळ विकासापासून अजूनही वंचितच राहिला आहे.चंद्रपुरातील वाहतूक कोंडीया विधानसभा क्षेत्रातील महत्वाचे आणि मोठे शहर म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण होऊ शकले नाही. रस्ते रुंदीकरणाची ओरड करून चंद्रपूरकर थकले, पण मनपा गंभीर नाही. स्थानिक आमदारांकडून यावर काय प्रयत्न सुरु आहेत, हे कळायला मात्र मार्ग नाही. बाबूपेठ उड्डाण पूलासाठी अद्यापही मूहूर्ताची कुदळ पडलेली नाही. वरोरा नाक्यावरचा उड्डण पूलही तीन वर्षांपासून पूर्ण होता होत नाही. महाकाय ढिगारे व बॅक वॉटरचंद्रपूरला कोळसा उत्पादनामुळे ब्लॅक गोल्ड सिटी म्हटले जाते. मात्र कोळसा वेकोलिची मुजोरी नागरिकांना रडकुंडीला आणत आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे.कोट्यवधीचा चुराडाचंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना पाच वर्र्षापूर्वी सुरू करण्यात आली. तिचेही भिजत घोंगडेच आहे.