शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी ९ जुलैला मतदान

By admin | Updated: June 8, 2016 00:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी ९ जुलैला मतदान होणार असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

आशिष देरकर कोरपनाचंद्रपूर जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी ९ जुलैला मतदान होणार असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.३ जूनच्या रात्री १२ वाजतापासून आचारसंहिता लागू झाली असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते व उमेदवार कामी लागले आहे. येत्या ८ जूनला निवडणुकीची नोटीस प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे. २० जून २३ जून या दरम्यान, उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहे. २४ जूनला अर्जांची छाननी होणार असून २८ जूनला नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. २८ तारखेलाच दुपारी ३ वाजतानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप होणार आहे. ९ जुलैला मतदान होणार असून ११ जुलैला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहते. १२ जुलैला निवडणूक निकालाची अंतिम यादी प्रकाशित होणार आहे.राज्यातील एकूण ९२ ग्रामपंचायतीपैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार असल्याने पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण राजकारणात चुरस निर्माण होणार असून कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, शेतकरी संघटना अशा अनेक पक्षांमध्ये कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत दिसणार आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असला तरी राजुरा विधानसभा क्षेत्रात खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना यांच्यातच होणार आहे. कारण राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात अजुनही भाजपची ताकद वाढली नाही. राजुरा विधानसभा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपचे आ.संजय धोटे, कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा झेंडा पकडून आहेत. मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे, हे या निवडणुकीत स्पष्ट होईल.