शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तंटामुक्त समितीला राजकारण अडसर

By admin | Updated: October 6, 2014 23:10 IST

१५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार

हरदोना : १५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा सरस आहे. हे गावातील नागरिकांना पटवून देत आहे. उमेदवारही मतदार राजापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत आहे. मात्र गावात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरत आहे.विधानसभा निवडणूकांचा सावत्रिक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी गणित जुळवित आहे.निवडणूक आठवड्याभरावर आली आहे. उमेदवारांना मतदार राजापर्यंत पोहचायला मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी राजकीय पक्षांकडून मतदारांना विविध आमिष दाखवून आपलेसे करण्यात राजकीय कार्यकर्ते गुंतले आहे. पाच वर्षात कधी गावात न पोहचलेले उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत पोहचत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष, कार्यकर्ते सकाळपासूनच गावात फिरत आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक काळात तंटामुक्त गाव समित्यांना सक्रिय राहणे गरजेचे आहे. निवडणुकी दरम्यान गावातील शांततेचा सारीपाट बदलत असतो. गावागावात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. अनेक जण पूर्णवेळ प्रचारात गुंतले आहे. असले तरी मतदार राजानी आता सावध राहणे तेवढेच गरजेचे आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मतदारांना आपले करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहे. अनेकांनी आमिषेही दाखविले आहे. मतदारांना भूल पाडण्यासाठी अनेक मार्ग शोधण्यात कार्यकर्ते मग्न आहे. त्यामुळे काही राजकीय कार्यकर्त्यांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव समितीला कोणतेही राजकीय वलय न लागता कोणताही निर्णय घेतात दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी निवडणूक काळात सक्रिय राहण्याची गरज सध्या आहे. निवडणूकीदरम्यान गावातील राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरु शकते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आता खऱ्या अर्थाने तंटामुक्त समित्यांकडे आले आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावात काम करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)