शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिश करून देण्याच्या नावाखाली दागिने पळविले

By admin | Updated: March 2, 2016 00:25 IST

दागिन्यांना पॉलिश करून देण्याची थाप मारून ते दागिनेच लंपास करणाऱ्या भामट्यांची टोळी चंद्रपुरात सक्रिय झाली आहे.

नागरिकांत भीती : सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहनचंद्रपूर: दागिन्यांना पॉलिश करून देण्याची थाप मारून ते दागिनेच लंपास करणाऱ्या भामट्यांची टोळी चंद्रपुरात सक्रिय झाली आहे. मंगळवारी दुर्गापूर परिसरातून या भामट्यांनी अशा पद्धतीने ४० हजारांचे दागिने लंपास केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या टोळीचा शोध घेणे सुरू केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. दुर्गापूर येथील रहिवासी किसन कुचनकार यांच्या घरी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम आले. आम्ही सेल्समन आहोत. सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करून देतो, अशी थाप त्यांनी मारली. त्यावर विश्वास ठेवत किसन कुचनकार यांची सून सारीका हिने पायातील चांदीचे दोन चाळ काढून दिले. त्या भामट्यांनी पावडरचा वापर करून ते चाळ स्वच्छ करून दिले. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिनेही साफ करून देतो, असे सांगितले. त्यावरही विश्वास ठेवून किसन कुचनकार यांच्या पत्नी शकुन यांनी १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र गळ्यातून काढून दिले. ते साफ करताना गॅसवर दागिने गरम करायचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर मंगळसूत्र व सोन्याची अंगठी एका स्टीलच्या डब्यात टाकले. त्यानंतर दोन भामट्यांपैकी एक इसम स्वयंपाकगृहात गेला. यावेळी किसन कुचनकार यांची पत्नी व सूनदेखील तेथे गेले. डबा गॅसवर ठेवल्यानंतर दुसऱ्या एका घरी दागिन्यांचा डबा गरम करण्यासाठी ठेवला आहे, तो डबा काढून आम्ही पुन्हा परत येतो, अशी बतावणी या भामट्याने केली व ते दोघेही तेथून निघून गेले. काही वेळाने कुचनकार यांच्या पत्नीने डबा उघडून पाहिला असता, त्यातील सोन्याचे दागिने गायब होते. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच, किसन कुचनकार यांनी यासंदर्भात दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे काही गुन्हेगार शहरात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कोणत्याही अनोळखी इसमाला घरात प्रवेश देऊ नये. अशा प्रकारचे गुन्हे करणारे संशयित कुठे आढळल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याबाबत लगेच माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे. - संदीप दिवाण,जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर