शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मनपा क्षेत्रातील ३६ हजार बालकांना पाजणार पोलिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:13 IST

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओे लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी ११ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपल्स पोलिओ लसीकरण : मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओे लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी ११ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. या दुसऱ्या फेरीत मनपा हद्दीतील ३६ हजार १८९ बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे.मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच चंद्रपूर मनपा सिटी टास्क फोर्सची सभा मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली. या सभेत उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शितल वाकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. नयना उत्तरवार, कार्यक्रम व्यस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, तसेच शहरातील सामाजिक स्वयंसेवी संस्थातर्फे पियुष माहेश्वरी, अनुप गांधी, रोटरी क्लब आॅफ चंद्रपूरचे अजय जैस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत चांदेकर, नरेश नासरे, रेड क्रॉस सोसायटीचे सुभाष मुरस्कर, जिल्हा एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे शोभा वनाखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक आर. व्ही. खांडरे जिल्हा माहिती अधिकारी, वन अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.बसस्थानक, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणी सुद्धा ३० ट्रांझिट टिमद्वारा लसीकरणाची व्यवस्था केली आहे. तसेच आयपीपीआय मोहिमेमध्ये घरोघरी जाऊन लस पाजण्याकरिता १८४ चमूची व्यवस्था करण्यात आली आहे.पाच बुथ, टिम करीता एक पर्यवेक्षक असे पल्स पोलिओच्या दिवशी २७ पर्यवेक्षक व घर भेटीसाठी ३६ पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस अवश्य पाजून घ्यावी, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे यांनी केले.चंद्रपुरात १३० लसीकरण केंद्रमहानगरपालिका कार्यक्षेत्रातील ३६ हजार १८९ बालकांना पोलीओ लस पाजण्यात येणार असून यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी, दवाखाने, इत्यादी ठिकाणी १३० तात्पुरती लसीकरण केंद्र (बुथ) स्थापन करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त प्रवासात असलेल्या व स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरिता १८ मोबाईल टिमची व्यवस्था केलेली आहे.