संजय वरघने चिमूरचिमूर ही शहिदांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तपश्चर्या करुन इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या चिमूर तालुक्यातील गावांमध्ये शांततामय वातावरण राहावे म्हणून राष्ट्रसंतानी गावागावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आणि गावात सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र राहून गुणागोविंदाने राहत आहेत. चिमूर तालुक्यात एकूण २६२ गावांचा समावेश असून ९८ ग्रामपंचायती आहेत. चिमूर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० हजारच्या जवळपास आहे. चिमूर तालुक्यात चिमूर पोलीस ठाणे व भिसी पोलीस ठाणे येत असून नेरी व शंकरपूर येथे पोलीस चौकी आहे. चिमूर पोलीस ठाणे अतिसंवेदनशील ठाणे म्हणून ओळखले जाते. चिमूरचे पोलीस ठाणे इंग्रजकालीनचिमूर ही शहीदांची भूमी असून देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले. यो पोलीस ठाण्याची स्थापना १९४७ साली झाली. तेव्हापासून हे ठाणे येथे अस्तित्वात आहे. चिमूर परिसरात इंग्रजांचे पोलीस इन्स्पेक्टर जरासंध व एसडीपीओ डुंगाजी यांची हत्या करण्यात आली. इंग्रजांना चिमूरकरांनी त्यावेळी ‘सळो की पळो’ करुन सोडले. भारतमातेला स्वातंत्र मिळवून देण्यात चिमूरचा सिंहाचा वाटा आहे. ठाणे व वसाहत समस्यांच्या विळख्यातचिमूर पोलीस ठाणे हे इंग्रजकालीन असल्यामुळे सदर इमारत ही जीर्ण अवस्थेत उभी आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ईमारतीला गळती लागले. त्यावर येथील कर्मचारी आपल्या निधीतून प्लॉस्टिक टाकून कसे कसे जीव मुठीत घेवून दिवस काढत आहेत. तसेच पोलीस वसाहतीची अवस्था वेगळी नाही. पोलीस ज्या क्वॉर्टरमध्ये राहतात. ते जिर्ण झाले असल्याने पोलिसांना निवासाची समस्या आहे. पोलीस कर्मचारी आपले कुटुंब घेवून त्याच जिर्ण क्वॉर्टरमध्ये राहत आहेत. काही भाड्याच्या खोलीत दिवस काढत आहेत. धार्मिक व पर्यटन स्थळचिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प, रामदेगी देवस्थान, राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा, जोगामोगा देवस्थान, मुक्ताई देवस्थान, भिसी व नेरी येथील हेमाडपंथी मंदिर, चिमूरातील श्रीहरी बालाजी देवस्थानात वर्षभर भक्तांची गर्दी असते. तसेच गोंदेडा यात्रा व चिमूरची बालाजी महाराजांची घोडायात्रेत अनेक यात्रेकरु दर्शनाला येत असल्याने पोलिसांना कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.वादविवादातून होतात हत्याचिमूर तालुक्यात शेतीचा वाद, छोटे मोठे वाद विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर खुनाच्या घटनेत होण्याचे प्रकार अनेकदा घडले. खडसंगी, तळोधी नाईक, वडाळा पैकु, नेरी परिसरात व चिमूरातही खुनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकसंख्या व पोलीस बळचिमूर तालुक्याची लोकसंख्या अंदाजे दिड लाखाच्या जवळपास असून या तालुक्यात २६२ गावांचा व ९८ ग्रामपंचायतीचा समावे आहे. मात्र त्या प्रमाणात चिमूर ठाण्याला फक्त ५४ पोलीस कर्मचारी व ५ अधिकारी असल्याने पोलीस प्रशासनासमोर सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिमुरात चोरीच्या प्रमाणात वाढ नुकतेच चिमूर येथील राज्य महामार्गावरील वडाळा गावात तीन ते चार दुकान फोडून मुद्देमालासह व काही वस्तु चोरुन नेल्याचा घटना घडल्यात. यासोबतच शहरातील गुरुदेव ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे दोन लाख रुपये पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.
शहीद भूमीतील पोलिसांची कसरत
By admin | Updated: February 13, 2015 01:32 IST