शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युगसाठी पोलिसांनी पालथा घातला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:05 IST

बुधवारपासून घरासमोरील चौकातून खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला आहे. चवथ्या दिवशीपर्यंत शोध न लागल्याने पोलिसांनी कामाची गती वाढवून अख्खा परिसर पालथा घातला आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या शोधमोहिमेला गती : अतिरिक्त पोलीस वर्ग युुगच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : बुधवारपासून घरासमोरील चौकातून खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला आहे. चवथ्या दिवशीपर्यंत शोध न लागल्याने पोलिसांनी कामाची गती वाढवून अख्खा परिसर पालथा घातला आहे.यापूर्वी २०१४ मध्ये ख्रिस्तानंद स्कूलमधून दुसऱ्या वर्गात शिकणारी शिवानी गजबे हिचे अपहरण झाले होते, परंतु २४ तासात मुलीसह आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले होते. लहान मुलीच्या अपहरणाने संपूर्ण ब्रह्मपुरी काही काळासाठी अशांत झाला होता. २२ आॅगस्टला युग नावाचा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला. चार दिवस लोटूनही त्याचा सुगावा न लागल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून परिसरातील तलाव, विहिरी, बोडी, सुनसान स्थळे पिंजून काढली आहेत तरीही या प्रकरणाचा छडा न लागल्याने पोलिसात ही चिंतनाचा विषय बनला आहे.अधिकाºयांसह शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत खंडाळ्याचा परिसर पिंजून काढणे सुरू आहे तरीही शोध न लागल्याने तर्कवितर्क अनेक काढले जात आहे. परिसरात या घटनेने लक्ष वेधले असले तरी पोलिसांसाठी हा विषय आव्हानात्मक ठरला आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.