यामध्ये धनराज गंजेवार (रा. वाढोणा), देवराव नेवारे (रा. गोविंदपूर), विनोद बन्सोड (रा. सावरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी तळोधी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सावरगाव येथील विनोद बन्सोड हा गावातील तलावाच्या पाळीवर दारूची विक्री करीत होता. त्याच्याकडे कापडी पिशवीत १७ देशी दारूचे नग सापडले. त्यांची किंमत १७ हजार रुपये एवढी आहे. गोविंदपूर येथे शनिवारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत देवराव उर्फ देवा नेवारे हा पानठेल्यात दारू विक्री करीत होता. पानठेल्याच्या मागे असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात टँगो पंचच्या १५ काचेच्या बॉटल आढळून आल्या. त्यांची किंमत ३० हजार रुपये एवढी आहे. तर वाढोणा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत धनराज गंजेवार हा येथील झुडपी जंगल शिवारात दारू विक्री करीत असताना रंगेहाथ सापडला. या तिन्ही आरोपींविरुद्ध तळोधी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर, पोलीस हवालदार जनार्धन मांडाळे, पोलीस काॅन्स्टेबल हंसराज सिडाम यांनी केली आहे.
तीन दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST