शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र

By admin | Updated: April 10, 2015 00:51 IST

जिल्ह्यात दारूबंदी होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.

बल्लारपूर/मूल/घुग्घूस : जिल्ह्यात दारूबंदी होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. जिल्हाभरात पोलिसांची कारवाई सुरू असून मूल पोलिसांनी २२ हजाराची तर बल्लारपूर येथे दीड लाखाची व घुग्घुस येथे ५७ हजार रूपयाची दारू जप्त केली. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. मूल पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मूल येथील सरदार मोहल्यातील लंजू सोमसिंग पटवा या महिलेच्या घरी पोलीस विभागाच्या पथकाने धाड टाकली. घराची झडती घेतली असता, जमिनीमध्ये खड्डा खोदून दारूच्या निपा लपवून ठेवण्यात आल्या होत्या. २२ हजाराची विदेशी दारू जप्त करून महिलेला अटक करण्यात आली. तर बल्लारपूर येथे विद्यानगर वॉर्डातील एका घरी पोलिसांनी धाड टाकून दीड लाखांची दारू जप्त केली. पवन विजय जयस्वाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे धाड टाकून चौकशी केली असता, स्लॉपवर पाण्याच्या टाकीत दारूसाठा लपवून ठेवलेला आढळला. यात १४४० बॉटल्स् होत्या. दारूसाठा जप्त करून दारूविक्रेत्याला अटक करण्यात आली. घुग्घुस येथे शेतातील घरी धाड टाकून ५७ हजाराची दारू जप्त करण्यात आली. यात बाबुराव वारलू थेरकर याला अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)