शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दारु तस्करी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By admin | Updated: April 8, 2015 00:05 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने लगतच्या आंध्र प्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. ...

पोलीस विभाग सज्ज : गावागावांत सुरू आहे जनजागृतीजिवती: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने लगतच्या आंध्र प्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जीवती पोलीस सतर्क झाले आहेत. यासोबतच गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे. वर्धा, गडचिरोली व आता चंद्रपूर जिल्ह्यात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दारुबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला. १ एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. पहाडावरील जीवती तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असल्याने तेथून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी जीवती, भारी, टेकामांडवा, वणी, ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असून महत्त्वाच्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर काही मद्यपींच्या जवळच असलेल्या केरामेरी, मेडीगुडा, इंदाबी या तेलंगणा राज्यातील गावात चकरा सुरू झाल्या आहेत. दारूबंदी होताच, या गावांतील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. या गावांतूनही जिवती तालुक्यात दारूची आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दारुबंदीनंतर सावरलेले कुटुंब पुन्हा उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी जिवती पोलिसांनी तेलंगणातून दारूसाठा पोहोचविण्यापूर्वीच दारूवर नियंत्रण ठेवण्यासाठी योजना आखली आहे. त्याचबरोबरच गावागावांत चालणारी मोहफुलाची दारू कायमची बंद राहावी, यासाठी जीवतीचे निरीक्षक ठाणेदार नरेंद्र वानखेडे यांनी गावागावांत जावून जागृती संदेश देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन ते गावकऱ्यांना करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)सीमेवरील गावांत अवैध दारू विक्रीतेलंगणा राज्याची सीमा येथून अगदी जवळ आहे. केरोमेरी, मेढीगुडा, इंदाणी आदी ठिकाणी तेलंगणाची दारु मोठ्या प्रमाणात विक्री होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यापेक्षा आंध्र प्रदेशातील दारुच्या किंमतीही कमी आहेत. त्यामुळे जवळपासच्या नागरिकांनी या गावांमध्ये आपली वर्दळ वाढविली आहे. काहींनी तेलंगणातून दारु आणून परिसरातील गावात दारु विकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.