शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मिळाली अत्याधुनिक व्यायामशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:21 IST

सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पोलीस कल्याणासाठी शासन भक्कमपणे पोलिसांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात. पोलीस कल्याणशी संबंधित नस्ती कधी आली व ती निगेटीव्ह असली तर ती मी पॉझिटीव्ह करतो. सायबर क्राईम लॅब प्रथमत: चंद्रपुरात सुरू झाली. २०१५ मध्ये ही सुरूवात करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा ठरला. पोलीस भरतीमध्ये जिल्हयाचे प्रमाण अधिक वाढावे, यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, पोलिसांसाठी निवासस्थाने तयार करीत आहोत. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोलिस कल्याणासाठी शासन पोलिसांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.चंद्रपूरात १.३६ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या पोलीस जीमचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोलीस दल अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही जिल्हयात १०२ कोटी रुपये खर्च करून पोलिसांसाठी क्वॉर्टरचे बांधकाम केले. बल्लारपूर येथे १० कोटी रूपये निधी खर्चून नव्या पोलिस स्टेशनचे बांधकाम, दुगार्पूर येथे नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम करीत आहोत. राज्यात काहीच ठिकाणी असणारी सीसीटिव्ही मोबाईल व्हॅन चंद्रपूरात आपण घेतली. पोलिसांना सुविधा देण्याबाबत हात आखडता घेणार नाही. जिल्हा दारुबंदी करताना जिल्ह्याच्या सदृढ आरोग्याचाच आम्ही विचार केला होता. पोलिसांनी या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला असून जिल्हा व्यसनमुक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये योगदान देण्याचे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले. या जीमच्या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्याला आकार देण्याचे काम होणार असल्याचे नियती ठाकर म्हणाल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.