गणेशोत्सवाचे पर्व : मनपा आणि प्रदूषण विभाग उदासीनचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली असली तरी गणशोत्सवादरम्यान, दरवर्षीच चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मूर्ती आणून त्याची विक्री केली जाते. यंदाही पीओपीच्या मूर्ती चंद्रपुरात आतापासूनच विक्रीसाठी आणल्या जात आहे. गुरूवारी शहर पोलिसांनी स्थानिक दीक्षित वाडी परिसरात धाड टाकून पीओपीच्या ८० मूर्ती जप्त करून त्या महानगर पालिकेच्या हवाली केल्या.यावरून शहरात मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मूर्ती येत असल्याची बाब सिद्ध झाली आहे. असे असले तरी पीओपीच्या मूर्तीविरुद्ध कारवाई करण्याची ज्या विभागाची जबाबदारी आहे, ते महानगर पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ या विषयात कमालिचे उदासिन असल्याचे दिसून येत आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक गणशोत्सवासह घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते. चंद्रपुरात मातीच्या मूर्ती तयार करणारे अनेक मूर्तीकार आहेत. मोठ्या परिश्रमातून हे कलावंत मूर्ती साकार करतात. मात्र ऐनवेळी शहरात पीओपीच्या मूर्ती दाखल होतात. बंदी असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा महानगर पालिका अशा मूर्तीं विक्रेत्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे स्थानिक मूर्तीकारांचा व्यवसायही प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)दीक्षित वाडीमध्ये धाडगुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जटपुरा गेट परिसराला लागून असलेल्या दीक्षित वाडीमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती एका ट्रकमधून आणण्यात आल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एका ट्रकमधून पोओपीच्या गणेश मूर्ती उतरवीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच सदर मूर्ती ताब्यात घेऊन कायदेशीर सोपस्कर पार पाडले. त्यानंतर या मूर्ती महानगर पालिकेच्या हवाली करण्यात आल्या. या मूर्ती अमरावती येथून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीओपीच्या मूर्तींवर पोलिसांची करडी नजर
By admin | Updated: September 12, 2015 00:49 IST