शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:57 IST

महिलांवर अत्याचार होऊ नये. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा सक्षम केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस सारथी या माध्यमातून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत मदत देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उभी झाली. असून पोलीस प्रशासन याकरिता कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी ठाण्याअंतर्गत भंगाराम तळोधी येथे मोफत रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : आरोग्य व पोलीस प्रशासनाकडून भंगाराम तळोधी येथे आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : महिलांवर अत्याचार होऊ नये. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा सक्षम केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस सारथी या माध्यमातून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत मदत देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उभी झाली. असून पोलीस प्रशासन याकरिता कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी ठाण्याअंतर्गत भंगाराम तळोधी येथे मोफत रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक कामत, पोलीस उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पेंदाम, ठाणेदार प्रवीण बोरकुटे, डॉ. धुर्वे, जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार विलास माडुरवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी म्हणाले, नियंत्रण कक्षाद्वारे महिलांकरिता १०९१ हेल्पलाइन, ९४०४८७२१०० व्हाट्सअ‍ॅपवर संपर्क साधल्यास संकटात सापडलेल्या महिलांना पोलीस वाहनाने त्यांच्या घरी सोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात अशा प्रकारची यंत्रणा सज्ज करण्यात आली.आरोग्य शिबिरात सांधेदुखी, अस्थिविकार, मधुमेह, हृदयरोग, स्थूलपणा, श्वसनाचे विकार, किडनीचे आजार अशा विविध आजारांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील १ हजार ६०० रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. १०० नेत्र रूग्णांची नेत्र तपासून चष्म्यांचे वाटप करण्यात आले. मोठा आजार असलेल्या रूग्णांना अन्य शिबिरांमध्ये तपासणी केली जाईल. पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य व पोलीस प्रशासनाकडून मोफत सुविधा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी दिली. सत्यवान सुरपाम, बिके तसेच आरोग्य, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.