शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:23 IST

भद्रावती पोलीस ठाण्याची भव्यदिव्य इमारत बनली आहे. आकर्षक आणि सुंदर, सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. यातून लोकांच्या तक्रारींचा यथाशीघ्र निपटारा व्हावा, स्मार्ट इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट बनून कामे करावी, अशी अपेक्षा राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सुंदर व सुसज्ज पोलीस ठाणे जनतेच्या सेवेत

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती पोलीस ठाण्याची भव्यदिव्य इमारत बनली आहे. आकर्षक आणि सुंदर, सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. यातून लोकांच्या तक्रारींचा यथाशीघ्र निपटारा व्हावा, स्मार्ट इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट बनून कामे करावी, अशी अपेक्षा राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, नरेंद्र जीवतोडे, पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी आदी मंचावर उपस्थित होते.पोलीस स्टेशन भद्रावती नवनिर्मित प्रशासकीय इमारत व निवासी इमारतीचे उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर चार वर्षांपूर्वी प्रथम प्रशासकीय इमारती कशा सुंदर बनविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले व संपूर्ण महाराष्टÑातील पोलीस स्टेशन स्मार्ट बनविण्याकरिता लक्ष केंद्रीत केले. चिमूर, बल्लारपूर, मूलनंतर भद्रावतीत स्मार्ट पोलीस स्टेशनची निर्मिती केली. या स्मार्ट पोलीस स्टेशनबरोबरच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा स्मार्ट बनूनच कामे करायला हवी, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही मनोगत व्यक्त केले.पालकमंत्र्यांचे आभारसुंदर भद्रावती शहरात सुंदर पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आल्याने या शहराच्या वैभवामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचप्रमाणे डोलारा तलाव सौंदर्यीकरणाकरिता विशेष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी पालकमंत्र्यांचे आभार मानले. शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने स्मार्ट पोलीस स्टेशनप्रमाणे चांगल्या दर्जाच्या कॅमेºयासाठी पालकमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणीसुद्धा केली.