शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा चोरीत पोलीस व वेकोलि अधिकाऱ्यांचाच हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:15 IST

कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सीबीआय चौकशी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा चोरी होत आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधून चोरीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात असताना अशाप्रकारची चोरी होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या चोरी दडण्यामागे वेकोलि व पोलीस प्रशासनाला शासनाचे पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. पैनगंगा कोळसा खाणीतून दररोज १० ट्रक कोळशाची चोरी होत आहे. ही चोरी नियमित होत असल्यामुळे सशस्त्र चोरीचे धाडस करण्यात आल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोतावार, माजी जिल्हाध्यक्ष शिवाराव, शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता अग्रवाल, माजी नगरसेवक राजेश अड्डूर, रशीद शेख आदी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे मोबदला जमा करावेकोलि प्रकल्पग्रस्तांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जात असल्यामुळे अनेकजण अद्यापही यापासून वंचित आहे. हा वाटप किती काळ चालेल, हे कळायला मार्ग नाही. शासनाने धनादेशाद्वारे प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यापेक्षा सदर रक्कम त्यांच्या खात्यात एकाचवेळी आरटीजीएसद्वारे जमा करावी, अशी मागणीही आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.घटनेने उडाली होती खळबळशनिवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास हायवा ट्रकसह ३० ते ४० जण वेकोलिच्या वणी क्षेत्रातील पैनगंगा कोळसा खाणीत सशस्त्र घुसले होते. मायनिंग सरदारच्या गळ्यावर तलवार ठेवून खाण लुटली होती.