शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहासह पोलीस चौकीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:30 IST

अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले.

ठळक मुद्देचार तास ठिय्या : अपघातानंतर योग्य कारवाई न केल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतशंकरपूर : अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले. जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत प्रेत न उचलण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस विभागाची चांगली तारांबळ उडाल्याची घटना रविवारी घडला.अखेर पोलीस उपअधीक्षक यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य केल्यानंतर चार तासानंतर प्रेत उचलण्यात आले. २२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता पार्वती कवडू चौधरी (६५) ही महिला भाजीपाला विकून घरी जात असताना भवानी चौकात भरधाव येणाºया दुचाकी वाहनाची त्यांना धडक बसली. सदर दुचाकी वाहन मनोज मेश्राम चालवित होता, त्याच्यासोबत दुसरा एक व्यक्ती बसला होता.जखमी महिलेला तत्काळ शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. मात्र रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पार्वती चौधरी यांचा मृत्यू झाला. मात्र आरोपीवर योग्य कारवाई न झाल्याने महिलेचे प्रेत शवविच्छेदनानंतर थेट पोलीस चौकीत आणण्यात आले.आरोपीवर योग्य कारवाई न करता अपघातातील वाहनाची हेराफेरी केली. वेळोवेळी चुकीची माहिती पोलीस विभागाने नातेवाईकांना दिल्याचा आरोप माना समाजाच्या नेत्यांनी केला. चार तास नातेवाईकांनी पोलीस चौकीत ठिय्या केल्यानंतर शिष्टमंडळाशी पोलीस उपअधीक्षक परदेशी यांनी चर्चा केली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत उचलले. यावेळी जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी मृताच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.चार पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदलीया प्रकरणात कारवाईत कसूर केल्याप्रकरणी शंकरपूर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोनकुसरे, पठाण, चाफले व नंदूरकर यांची तडाफडकी बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.