शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा नगर पंचायत स्वच्छता अ‍ॅप क्रमवारीत देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:45 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील पोंभुर्णा नगर पंचायत १७ जानेवारीला झालेल्या स्वच्छ डॉट सीटी वेबसाईटच्या गणनेत स्वच्छता अ‍ॅप क्रमवारीत भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. त्यामुळे पोंभुर्णा शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतला २७४ गुण : स्वच्छ डॉट सीटी वेबसाईटचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील पोंभुर्णा नगर पंचायत १७ जानेवारीला झालेल्या स्वच्छ डॉट सीटी वेबसाईटच्या गणनेत स्वच्छता अ‍ॅप क्रमवारीत भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. त्यामुळे पोंभुर्णा शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासीबहुल पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाने वेग घेतला असून नगरपंचायतीच्या स्थापने पासूनच या क्षेत्रात रस्ते विकास, पाणीपुरवठा या बाबींना अग्रक्रम देत त्यांनी शहरात विकासाचे विविध उपक्रम राबविले आहेत. पोंभुर्णा नगरपंचायतचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करुन नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला. यावर नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांची नोंद केली. त्याची दखल घेत त्या समस्या व तक्रारी सोडविण्यात आल्या. याबाबतच नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांचे ४०० मार्कासाठी गुणदान करण्यात आले. त्यापैकी पोंभुर्णा नगरपंचायतीला २७४ गुण प्राप्त झाले.त्यामुळे पोंभुर्णा नगरपंचायत अ‍ॅप वापरण्यामध्ये देशात पहिल्या क्रमाकांची ठरली आहे. यापूर्वी चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके देशातील सर्वात सुंदर व स्वच्छ रेल्वे स्थानके म्हणून पुरस्कृत ठरली आहेत. पोंभुर्णा नगरपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविल्याने वनमंत्री मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.इको-पार्क टाकतोय सौदर्यांत भरभारतरत्न अटलबिहारी बाजपेयी इको पार्क, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाची देखणी इमारत, नव्याने बांधकाम सुरु असलेली नगरपंचायतची इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासोबतच नव्या देखण्या बसस्थानकाचे नुकतेच भूमिपूजन झाले असून टूथपिक उत्पादन प्रकल्प, आयटीशीच्या साहाय्याने अगरबत्ती प्रकल्प, बांबू हॅडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट असे विविध रोजगाराभिमुक उपक्रम शहरात कार्यान्वित झाले आहेत.मागील काही महिन्यांपासून नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत असून १७ जानेवारीच्या गणनेत पोंभुर्णा नगरपंचायतीने ४०० पैकी २७४ गुण पटकावून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.-विपीन मुद्धा, मुख्याधिकारी, नगर पंचायत, पोंभुर्णा