मागील अनेक दिवसांपासून येथील खुल्या जागेचा कोणीच उपयोग करीत नसल्याने तसेच महापालिकेनेही ओपन स्पेसचा कोणताही विकास न केल्यामुळे
शहरातील काहींचे येथील खुल्या जागेकडे लक्ष गेले. त्यांनी ही जागा विकण्याचा प्रयत्न केला; मात्र जागरुक नागरिकांमुळे जागा विकता आली नाही. दरम्यान, या जागेला आता सावित्रीबाई फुले बाल उद्योग असे नामकरण करून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाप्रमुख कुसूम उदार, एन. सिडाम, साहेबराव मानकर, चंद्रभागा कुचनकार, संध्या सिडाम, कविता मानकर, अर्चना उदार, मनोज वासाडे, कैलास धुमाळे यांच्यासह वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती.
बाॅक्स
बालउद्यानाचा लागला फलक
तुळशी नगरातील सर्व्हे नं. १५ मध्ये बालकांना खेळण्यासाठी ओपन स्पेस ठेवण्यात आला; मात्र काहींना यातील प्लाॅट विकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वार्डातील जागरुक नागरिकांनी प्लाॅट विकण्याला विरोध करीत या ठिकाणी सावित्रीबाई फुले असे नामकरण करून फलक लावला.
बाॅक्स
महापालिकेने लक्ष देण्याची मागणी
ओपन स्पेसचा विकास करून महापालिकेने बालकांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. वाॅल कम्पाउंड तसेच बालकांसाठी खेळण्याचे साहित्य लावून दिल्यास परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी सोयीची जागा होईल, असेही येथील नागरिकांची मागणी आहे.