शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मोहाडी ते बोथली राज्यमार्गाची दैना

By admin | Updated: November 20, 2014 22:48 IST

तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा ते मोहाडी व मोहाडी ते बोथली पर्यंतच्या रस्त्याची ऐसीतैसी झालेली असून जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वर्षभरात लाखो रूपये

सिराज शेख - मोहाडीतुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा ते मोहाडी व मोहाडी ते बोथली पर्यंतच्या रस्त्याची ऐसीतैसी झालेली असून जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वर्षभरात लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र भ्रष्टाचाराच्या कीड्याने हा रस्ता कुरतडून परिस्थिती ‘जैसे थे’ केली आहे.तुमसर भंडारा राज्य मार्गाची देखभाल दुरूस्तीची जवाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्याकडे आहे. या उपविभागाकडे तुमसर ते वरठी पर्यंतचा रस्ता येतो. तसेच मोहाडी तालुक्यातील इतरही काही डांबरी रस्ते या उपविभागाकडे आहेत. मात्र सारेच रस्त्यांची परिस्थिती एकसारखी आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी येथील सहायक अभियंता विजया सावरकर या नेहमी दोऱ्यावर किंवा मिटींगमध्ये व्यस्त असतात. कार्यालयात कधीकाळच दिसतात. त्यांच्या दौऱ्याचा व मिटींगचा किती फायदा रस्ते विकासासाठी झालेला आहे याचे उत्तर त्यांनाच माहित. या राज्य मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. प्रवाशांना व वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून चालावे लागते. दोन वर्षापुर्वीच वरठी ते मोहाडी पर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र हा रस्ता सहा महिन्यातच उखडला. तेव्हापासून या रस्त्याची दुरावस्था होत आहे. तुमसरपासून ते वरठी पर्यंतच्या रस्त्याची अनेक वेळा डागडुगुजी करण्यात आली. मोठमोठे खड्डे गिट्टी व डांबराच्या मिश्रणाने बुजविण्यात आले. मात्र कमी दर्जाचा डांबर वापरत असल्याने बजुविलेले खड्डे महिन्या भरातच उखडतात. आताही काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. एकच काम अनेकवेळा करण्यात मोहाडीचे बांधकाम विभाग पटाईत असल्याचे जाणवते. जनतेच्या कराचा पैसा असा वाया घालविला जात आहे.