शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

नादुरुस्त तलाव गेटमुळे शेतकऱ्यांना अडचण : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त ...

नादुरुस्त तलाव गेटमुळे शेतकऱ्यांना अडचण : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने तलावाच्या दुर्दशेमुळे येथील शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.

परिणामी, दुबार पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे.

येथील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व पारंपरिक व्यवसाय आहे. गावातील अनेक कुटुंबे शेती हा व्यवसाय करूनच त्यांची उपजीविका करतात. शिवाय, या व्यवसायावरच आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधतात. या गावाच्या शिवारात जवळपास तीन तलाव आहेत. या तिन्ही मोठ्या तलावांमुळे परिसरातील शेतकरी हजारो हेक्टरवर खरीप आणि रब्बी पिके घेत असतात. परंतु, जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे आणि पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे. सदर तलावाच्या पाण्याने अंदाजे ५०० हेक्टरवरील शेती दुबार सिंचित केली जाते. तलावात गावातील मच्छीमार सोसायटीमार्फत मत्स्य व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, मागील जवळपास तीन ते चार वर्षांपासून या तलावाच्या गेटच्या लोखंडी पाट्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे मागील काळात प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊनसुद्धा तलावाच्या पाण्याची पातळी शून्यावर आली आहे.

भौगोलिकदृष्ट्या बघितले तर सदर तलावाभोवती सुंदर वनराई नटलेली आहे आणि सभोवतालच्या परिसरात वन्यप्राण्यांचा सारखा व बारमाही वावर असतो. येथे बिबटे, अस्वल, पट्टेदार वाघ, रानगवा, हरीण, सांबर, चितळ आदी लहानमोठे प्राणी आणि मोठे हिंस्र प्राणीसुद्धा येथे बघायला मिळतात. या बाबीचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे.

बॉक्स

वारंवार दिली निवेदने, मात्र उपयोग नाही

या संदर्भात गेट दुरुस्ती करण्याकरिता लाभधारक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, सिंचाई शाखा नागभीड आणि सिंदेवाही विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्यांना सदर विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर अधिकारीवर्ग प्रचंड उदासीन का, असा गहन प्रश्न निर्माण होत आहे.

बॉक्स

मत्स्य व्यवसाय डबघाईस

गेटच्या नादुरुस्तीमुळे शेतकरीवर्गाला दरवर्षी पिकाच्या तोंडी आलेल्या घासाला मुकावे लागत आहे. तसेच तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर असल्याने मच्छीमार सोसायटीचा मत्स्य व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे. दरम्यान, संबंधित पाटबंधारे विभागाच्या सिंचाई शाखेने या बाबीची गंभीर दखल घेऊन तलावाच्या गेटची तत्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी, अशी मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदास शेंडे व लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची अवस्था अत्यंत वाईट आहे. गेट सुरळीत नसल्याने पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, लाभार्थी शेतकरी दुबार पीक घेण्यापासून मुकले आहेत.

- ब्रह्मादास शेंडे,

युवा सामाजिक कार्यकर्ते,

जनकापूर