लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पंचायत समितीला भेट दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नवीन इमारत बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज ही इमारत पूर्ण होऊन लोकार्पण करताना मला आनंद होत आहे. केवळ इमारत उत्तम असणे पुरेसे नाही तर या माध्यमातून लोकहिताची उत्तम दर्जाची कामे झाली पाहिजे. पंचायत समिती ही मिनी मंत्रालयच आहे. त्यामुळे ही इमारत सर्वसामान्य जनतेच्या समस्या निराकरणाचे प्रशस्त दालन ठरावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सोमवारी मूल पंचायत समिती इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्याम जुमनाके, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जि. प. सभापती राजू गायकवाड, सुनिल उरकुडे, नागराज गेडाम, नितू चौधरी, सदस्य शितल बांबोळे, पृथ्वीराज अवताडे, पंचायत समिती सदस्य जयश्री वलकेवार, वर्षा लोनबले, माजी सभापती पूजा डोहणे, संजय मारकवार, राजेंद्र्र गांधी, प्रवीण पडवेकर, प्रभाकर भोयर उपस्थित होते.आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, या मतदारसंघात पाच वर्षांत विकासाचे अनेक प्रकल्प आणले. यातील काही पूर्ण व काही निर्माणाधिन आहेत. सिंचनासाठी वरदान ठरणारा चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. हूमन सिंचन प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. चिरोली येथील बंधारा पूर्ण झाला.४०३ अंगणवाड्या आयएसओ मांनांकित केल्या. टाटा ट्रस्ट व चांदा ते बांदा या योजनेतंर्गत अनेक उपक्रम राबविले. चिचाळा व लगतच्या सहा गावांसाठी पाईपलाईनद्वारे सिंचन सुविधा पुरविण्याची योजना पूर्ण झाली. मूल शहरात इको पार्क, तहसील कार्यालय, स्टेडियम, जलतरण तलाव, पाणीपुरवठा योजना, बसस्थानक, वाचनालय, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, भाजी बाजाराचे बांधकाम, विश्रामगृह, सिमेंट रस्त्यांचे बांधकाम अशी विविध विकासकामे सुरू आहेत. काही कामे पूर्णत्वाला आल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितने. जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समिती सभापती मारगोनवार आदींची भाषणे झाली.सत्तेत नसलो तरी निधी आणणारएमएसएमईच्या माध्यमातून मूल व पोंभुर्णा तालुक्यात नवीन प्रकल्पांसाठी निधी देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. आज सत्ता पक्षात नसलो तरीही मतदारसंघ व जिल्ह्याच्या विकासाला निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, अशी ग्वाही राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.
प्रशस्त इमारत समस्या निराकरणाचे दालन ठरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्याम जुमनाके, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जि. प. सभापती राजू गायकवाड, सुनिल उरकुडे, नागराज गेडाम, नितू चौधरी, सदस्य शितल बांबोळे, पृथ्वीराज अवताडे, पंचायत समिती सदस्य जयश्री वलकेवार, वर्षा लोनबले, माजी सभापती पूजा डोहणे, संजय मारकवार, राजेंद्र्र गांधी, प्रवीण पडवेकर, प्रभाकर भोयर उपस्थित होते.
प्रशस्त इमारत समस्या निराकरणाचे दालन ठरावे
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मूल पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण