शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:56 IST

राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी व रुग्ण कल्याण समितीनी दवाखान्याला भेट दिली असता सलग दोन दिवस वैद्यकीय अधिकारी .....

ठळक मुद्देतोंडी आदेश देऊन तालुका वैद्यकीय अधिकारी मोकळे : जबाबदार अधिकारीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसुब्बई : राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी व रुग्ण कल्याण समितीनी दवाखान्याला भेट दिली असता सलग दोन दिवस वैद्यकीय अधिकारी सकाळी १० वाजेपर्यंत दवाखान्यात पोहोचलेच नाही. याशिवाय दवाखान्यात एकही कर्मचारी व नर्सही दिसून आली नाही. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, या केंद्रात उपचार करणाºया वैद्यकीय अधिकाºयांना तसा नियुक्ती आदेशच नसल्याची माहिती समोर आली.गुरुवारी रुग्ण कल्याण समितीने दवाखान्यात भेट दिली असता सकाळी १०.३० च्या सुमारास डॉ. अहीरकर हे दवाखान्यात पोहचले. परंतु रुग्णांना सेवा देण्याकरिता ते असमर्थ ठरले. कारण या आरोग्य केंद्रात तेव्हा एकही कर्मचारी व नर्स उपस्थित नव्हते. नंतर परिसरातील लोकांनी आणि रुग्ण कल्याण समितीने उशिरा येण्याचे कारण विचारले असता एक मोठी धक्कादायक बाब उघडकीस आली. डॉ.अहीरकर यांनी सांगितले की त्यांना या दवाखान्याचा नियुक्ती आदेश नाहीे. उपचारदरम्यान रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही. त्यांच्या या धक्कादायक उत्तराने नागरिक व समितीचे सदस्य चांगलेच संतापले. कर्मचारीही दवाखान्यात राहून कर्तव्य न बजावता क्वॉर्टरमध्ये असतात.