शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : मराठी कलावंताची ‘लोकमत’शी बातचित

राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत. तुम्ही कुठेही काम करीत असाल तर तुम्हाला कलाकार म्हणून स्वत:ला तपासणे गरजचे आहे. चित्रपटांमध्ये तशी संधी राहत नाही. कारण सिनेमामध्ये ‘रिटेक’ असतो. मात्र नाटकात अखंड काम करावे लागते व नाटकात रिटेक नसतो. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटकात भूमिका साकारणे हे कलाकारांपुढे आव्हान असते, असे मत मराठी सिनेमातील कलावंत मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चिमूर तालुक्यातील नेरी येथे आयोजित ‘गद्दार’ नाटकात ‘नाम्या’ ची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली होती. नाटकाच्या मध्यंतरात त्यांना गाठून त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने बातचित केली. मराठी चित्रपटसृष्टीत व ‘नाम फाऊंडेशन’ संस्थेच्या कार्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे मकरंद अनासपुरे म्हणाले, सगळ्याच भागातील चित्रपट बनले आहेत. आता झाडीपट्टीतील विषयांवर चित्रपट बनायला हवा. झाडीपट्टी रंगभूमीतील अडचणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार आहे व मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने ते झाडीपट्टीला न्याय देतील. सगळ्याच ग्रामीण भाषेत गोडवा आहे. त्यामुळे ती भाषा मंचावर येणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकºयांच्या समस्या राहणार नाही व आत्महत्याही होणार नाही. सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही.त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकरीही स्वाभिमानी आहेत. गरज नसल्यास ते कर्ज घेत नाही. मात्र परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज घेतो व कर्जापायी आत्महत्या करतो.मात्र सामाजिक बांधीलकी म्हणून ‘नाम’ फाऊंडेशनद्वारे शेतकºयांसाठी काही प्रमाणात काम केले जात आहे. नाम फाऊंडेशन कुणावर टिका किंवा प्रसिद्धीसाठी काम करीत नाही. नाम फाऊंडेशन शेतकरी, विधवा, वीर सैनिकांसाठी काम करते. त्यामध्ये शेतकºयांना १५ हजार तर शहीद सैनिकांना २ लाख ५० हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.‘नाम’ द्वारे जलसंघटनांचेही कामे केली जात आहेत. १२८ गावात नद्या, तलाव, कालवे खोलीकरणाचे काम केलेत.नक्षलग्रस्त गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा नाम फाऊंडेशनचे काम सुरू करणार आहोत. सगळ्यांनी माणुसकीचा विचार केल्यास या संघटनांना काम करण्याची गरज भासणार नाही. मात्र ‘आपलं पोट भरलं ना, मग दुसºयांचा विचार का करायचा’, अशी मानसिकता समाजात असल्याची खंतही मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.झाडीपट्टीत मागच्या जानेवारीपासून येण्यास सुरूवात केली. झाडीपट्टीत मोठे कलाकार आहेत. कलाकारांनी कलेचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. संधी मिळावी म्हणून जो धडपडतो, तो कला क्षेत्रात टिकतो, असेही मकरंद यांनी सांगितले.