कोरपना : तालुक्यातील अनेक गावांलगत व पहाडावर असलेल्या वनजमिनी वृक्ष्यांअभावी ओसाड पडलेल्या आहे. त्या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.
बऱ्याच स्थानी वृक्षतोड झाल्याने व वृक्ष लागवड केली नसल्याने वनजमिनीचे वन अधिपत्याखालील क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनासाठी वनाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने गवत व मिश्र रोपवन कार्यक्रम राबवून वनविभागाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. तालुक्यातील भोयगाव, निजामगोंदी, कारगाव, चिंचोली, जांभूळधरा, खैरगाव, गाडे गाव, इरई, कवठाळा, जैतापूर, तुळशी, तांबडी, जेवरा, थिप्पा, शिवापूर, मांगल हिरा, परसोडा, अकोला,कोठोडा, रायपूर, पारडी, घाटराई, सावलहिरा, टागळा, हातलोणी, कमलापूर, येरगव्हाण, इंजापूर, नारडा, मांडवा, वनोजा, दुर्गाडी, रूपापेठ, उमरहिरा आदी गावांलगत असलेल्या राखीव वनक्षेत्रामध्ये नव्याने वृक्ष लागवड होणे गरजेची आहे. यासाठी वनविभागाने संपूर्ण वनक्षेत्रात वनीकरण कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे.