शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

राज्यात दोन वर्षांत प्रगतीच्या दृष्टीने नियोजन

By admin | Updated: November 2, 2016 00:55 IST

राज्यात मागील दोन वर्षात प्रगतीच्या दृष्टीने नियोजन झाले.

सुधीर मुनगंटीवार : सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त संवादचंद्रपूर : राज्यात मागील दोन वर्षात प्रगतीच्या दृष्टीने नियोजन झाले. कृषी, पर्यटन, उद्योग, सिंचन या क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्याचा प्रयत्न या काळात जाणीवपूर्वक झाला. त्याचे सकारात्मक परिणाम आता जनतेलाही दिसायला लागले असून राज्य खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केले.राज्य सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमीत्त आपल्या कामगिरीचा आलेख मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व नियोजन सरकारने केले आहे. मतदानाच्या रूपाने जनतेने काम करण्याची आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याची संधी दिली. हे लक्षात घेऊनच सर्व क्षेत्रात नियोजनपूर्वक पाऊले उचलली जात आहेत. राज्याचा विकासदर दोन वर्षापूर्वीच्या काळात ५.८ टक्के होता. तो २.२ टक्यांनी वाढवून आता ८ टक्के झाला आहे. ३.३० कोटीचे कर्ज आणि २७ हजार कोटी रूपयांच्या व्याजाचा वारसा घेवून आमच्या सरकारने राज्यात कामाला सुरूवात केली. पेन्शन, मुद्दल या सर्व महत्वाच्या बाबी सांभाळत आणि विकासाचा आर्थिक समतोल साधत राज्य विकासाच्या दिशेने प्रवास करीत आहे.मागील पाच वर्षात भांडवली खर्च कमी आणि महसुली खर्च अधिक अशी परिस्थिती होती. मागील दोन वर्षात भांडवली खर्च ३५ हजर कोटींवर आणला असून विकासदर वाढवून रोजगारात वाढ केली. दुर्लक्षित असलेल्या कृषी क्षेत्रात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. जलयुक्त शिवार योजनेतून मागील दोन वर्षात ११ हजार ४८६ गावांमध्ये दोन लाख ४१ हजार ९७ कामे झाली. नऊ हजार शेततळी पूर्ण झाली. मागेल त्याला शेततळे हा उपक्रम राबविला. येत्या तीन वर्षात गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा निश्चय आहे.विदर्भ सिंचन अनुषेशासंदर्भा ना. मुनगंटीवार म्हणाले, अमरावती विभागात दोन वर्षांच्या काळात ३ हजार ६० कोटी रूपयांचा खर्च झाला. काँँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात हा खर्च फक्त एक हजार ७५० कोटींचा होता. २१ हजार ७३५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. अनुशेष भागातील १६ हजार ४७६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले. कृषीक्षेत्रात दुप्पट पैसा खर्च केला. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात पीक विमा योजनेचा लाभ मिळवून दिला. शस्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली. २७ कोटींचा विमा सरकारने भरला. राज्यातील ५१ लाख मोबाईलधारक शेतकऱ्यांना ५८ कोटी एसएमएस पाठविले. आत्महत्याग्रस्त शेतकरी भागात ठोस उपाययोजना केल्या. शेतकऱ्यांना अर्थिक मदत दिली. मत्स्यव्यवसायात रोजगाराची नवी संधी मिळवून दिली. राज्यातील अपराधसिद्धी दर पूर्वी नऊ टक्के होता. तो आता ५४ टक्यांवर आणला. यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला. कोणत्याही ठिकाणावरून आॅनलाईन एफआयआर नोंदविण्याची सुविधा निर्माण करून दिली. चंद्रपूरच्या धर्तीवर राज्यात फॉरेन्सिक लॅब उभारण्याचे नियोजन झाले असून कामही सुरू झाले आहे.पोलीस कल्याणाच्या दृष्टीने सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. गतीमान न्यायासाठी न्यायालयाच्या नव्या ईमारती बांधकामांना मंजुरी दिली. उच्च न्यायालयाचे अभिलेखे डिजिटल करण्यासाठी ३० कोटी रूपये दिले. ऊर्जा क्षेत्रातही मोठी कामगिरी सरकारने केल्याचे सांगून ते म्हणाले, प्रशासकीय कामकाजात अनेक सुधारणा आणि बदल या दोन वर्षात घडवून आणले. त्यामुळे कार्यप्रणाली सुटसुटीत आणि नागरिकांसाठी विनात्रासाची होत आहे. आदिवासी विकास, शैक्षणिक क्षेत्रातही अनेक नवे निर्णय या दोन वर्षात सरकारने घेतले. आरोग्यच्या दृष्टीने नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केली. मंजूर वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा वाढविण्यावर आणि योग्य आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर आहे. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन या सोबतच ताडोबा अभयारण्य जागतिक दर्जाचे बनविण्याच्या दृष्टीने सरकार कार्यरत आहे. आरोग्य, प्रदूषण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सरकार काम करीत असून अनेक स्तरावर कल्याणकारी योजना राबवित आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विकासवृद्धीमधून दिसणार आहे, असा दावाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, सभापती देवराव भोंगळे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)