शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

सिव्हरेज योजनेला नियोजनशून्यतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 00:49 IST

चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना सहा वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली.

कामे पुन्हा ठप्प : विकास आराखड्यात आणखी वाढीव पाईपलाईन प्रस्तावितरवी जवळे चंद्रपूरचंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना सहा वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासून या योजनेत नियोजनाची ऐसीतैसी करण्यात आल्याने ही योजना सहा वर्षातही पूर्णत्वास येऊ शकली नाही. ७० कोटींची ही योजना आता सुमारे सव्वाशे कोटींवर जाऊन पोहचली आहे. पठाणपुरा व रहमतनगर येथे यासाठी सिव्हरेज प्लांट तयार केले आहे. मात्र तेदेखील सदोष असल्याने योजनेला ग्रहण लागले आहे.विशेष म्हणजे, या योजनेच्या फलश्रुतीवर मनपातील अधिकारी व पदाधिकारी सकारात्मक भाष्य करू शकत नाही. तरीही प्रस्तावित शहर विकास आराखड्यात या योजनेला शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आणखी वाढविण्याचे प्रस्तावित केले आहे. चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर हळूहळू विकास कामे केली जात आहे. मात्र शहराचा चेहरामोहरा अद्याप बदलू शकला नाही. २००७ मध्येच या भूमिगत मलनिस्सारण योजनेबाबत नगरपालिका स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. २००९-१० मध्ये भूमिगत मलनिस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यानंतर योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आले. मात्र २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २०१६ उजाडले आहे. मात्र भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. मात्र नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकदा चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले असताना तेदेखील नदीपात्रात प्लॅन्ट पाहून थक्क झाले होते, हे विशेष. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लॅन्ट पठाणपुरा परिसरात आहे. रहमतनगर येथील प्लांट सदोष असल्याने त्याचे काम तिथेच थांबविण्यात आल्याची माहिती आहे. या योजनेचे आणखी बरेच काम शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर योजनेची तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करणे अनिवार्य आहे. या तपासणीतही ही योजना ‘उत्तीर्ण’ होईल काय, हा प्रश्नच आहे.विशेष म्हणजे, या उन्हाळ्यात या योजनेतील कोणतेही काम करण्यात आलेले नाही. आता उन्हाळा संपत आला आहे. लवकरच पावसाचे आगमन होईल. त्यानंतर आणखी चार महिने या योजनेचे काम बंदच राहणार आहे. आणखी वाढविणार पाईपलाईन ?भूमिगत मलनिस्सारण योजनेच्या फलश्रुतीवर आधीच संभ्रमावस्था आहे. खुद्द नगरसेवकच ही योजना यशस्वी होईल का, हे सांगू शकत नाही. तरीही महानगरपालिकेने नुकत्याच सादर केलेल्या शहर विकास आराखड्यात शहर पुढे आणखी विस्तारित होईल, म्हणून या योजनेची पाईललाईन आणखी काही किलोमीटर वाढविण्याचे प्रस्तावित केले आहे. विलंबामुळे योजनेची वाढली किंमतभूमिगत मलनिस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. आता पुन्हा योजनेची किंमत वाढून ती १०० कोटींच्याही पार गेल्याची माहिती आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर आणखी अंदाजपत्रकीय किंमत वाढण्याची शक्यता आहे.