शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:21 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासन सज्ज : मतमोजणीत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात बैठक घेण्यात आली.यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांनी अधिकारी व कर्मचाºयांना मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचे सादरीकरण केले. सुरक्षा व्यवस्था, टपाली मतपत्रिकांची गणना, मतमोजणी व्यवस्था, व्हीव्हीपॅट मतमोजणी, मतमोजणी कक्ष संरचना, मतमोजणी कक्षात वावरताना घ्यावयाची काळजी, निवडणूक निकालाची प्रसिद्धी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी सभागृहात १४ टेबल राहणार आहेत. प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचा मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. मतमोजणी सूक्ष्म निरीक्षण, मतमोजणी प्रक्रियेची शुद्धता तपासण्याकरीता व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. प्रत्येक सभागृहाकरिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीतील किमान दोन कंट्रोल युनिटची रँडम तपासणी आयोगाचे निरीक्षक चाचणी पद्धतीने करू शकतात. निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना १७ सी भाग २ च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील जेणेकरून पुढे कोणत्याही पूनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी एस. भुवनेश्वरी, निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९chandrapur-pcचंद्रपूर