शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघातासाठी मनपाचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:31 IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघाताचे मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे.

अंमलबजावणी करणार : मृत्यू कमी करण्याचा प्रयत्नचंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघाताचे मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. सर्वाधिक उष्म अशा काही जिल्ह्यांमध्ये असा आराखडा राबविला जाणार असून, त्यात चंद्रपूरचा समावेश आहे. याबाबत, आयुक्त संजय काकडे यांनी कृती आराखडा समितीचा आढावा घेतला.आढावा बैठकीला उपायुक्त विजय देवळीकर, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. बिसेन, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अल्का आकुलवार, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, एमईएमएसचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घाटे, मनपा प्रभाग अधिकारी सरोदे, जन्म- मृत्यू विभाग प्रमुख ज्योती देशमुख, अतिशकुमार चव्हाण, आर. पी. कळम आदी उपस्थित होते. मनापच्या वतीने गेल्या वर्षी कृती आराखड्यांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात शित वार्ड सुरु करण्यात आला होता. या वार्डात २७ रुग्ण दाखल झाले होते. औषधोपचारानंतर सर्व रुग्ण बरे झाले. एकही मृत्यू झाला नाही. यावर्षीही आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आराखड्यांतर्गत करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती डॉ. आंबटकर यांनी पावर पार्इंट प्रेझेंटेशनद्वारे यावेळी दिली. बैठकीत विविध अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारींचा आढावाही घेण्यात आला. आयुक्त काकडे यांनी यावेळी उष्माघात प्रतिबंधाबाबत जनजागृती, बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ, पिण्याच्या पाण्याची जागोजागी उपलब्धता, विविध शासकीय कार्यालयांना त्यांच्या आवारात शेड उभारणी करण्याबाबत निर्देश दिले. चंद्रपूरवासीयांनी मनपाच्या कृती आराखडा अंमलबजावणीत सहकार्य करुन उष्माघातापासून होणाऱ्या दुष्परिणामास स्वत: व इतरांना संरक्षण देण्यासाठी मदत करावे, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, सभापती संतोष लहामगे, एस्तेर शिरवार व आयुक्त, उपायुक्तांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)