शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जंगल छावणी चेकपोस्ट रस्त्याची दयनीय अवस्था

By admin | Updated: July 26, 2016 01:06 IST

वेकोलि लालपेठ क्षेत्र चंद्रपूर ग्रा.पं. नांदगाव (पोडे) अंतर्गत असून जंगल छावणी वस्ती चेकपोस्ट ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

वसाहतीमध्ये चिखलाचे साम्राज्य : वेकोलिने लक्ष देण्याची मागणीकोठारी : वेकोलि लालपेठ क्षेत्र चंद्रपूर ग्रा.पं. नांदगाव (पोडे) अंतर्गत असून जंगल छावणी वस्ती चेकपोस्ट ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वेकोलिने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी. तसेच रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नांदगाव (पोडे) येथील उपसरपंच मल्लेश कोडारी यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.जंगल छावणी वस्ती, चेकपोस्ट ते हनुमान मंदिरपर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या रस्त्यावरुन गावकरी, शाळकरी मुलांचे जाणे-येणे असते. दैनावस्थेमुळे रस्त्यावरुन वाहतूक करताना अनेक दुचाकीचालकांचा अपघात होवून जीवही गमवावा लागत आहे. वेकोलिचे कामगार याच रस्त्यावरुन दिवस- रात्र कर्तव्यासाठी ये-जा करीत असतात. त्यांनाही जीव मुठीत घेवून या रस्त्यावरुन नाईलाजास्तव जाणे-येणे करावे लागते. या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम वेकोलि लालपेठ क्षेत्राचे आहे. त्याकरिता त्यांना ग्रामपंचायतीद्वारे ग्रामस्थांचे निवेदन देवून विनंती करण्यात आली होती. मात्र त्याकडे वेकोलि उपप्रबंधक जाणीवपूवक दुर्लक्ष करीत आहेत.त्याचप्रमाणे गेल्या पंधरा वर्षापासून बीसीडी टाईप वसाहत मायनर्स वसाहतीमधील नाली सफाई, नाली दुरुस्ती तसेच कचराकुंडीची व्यवस्था योग्यरित्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे े वसाहतीत सर्वत्र दुर्गंधी पसरली असून वसाहतवासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबतही ग्रामपंचायतीने वेकोलिच्या उपप्रबंधकांना अवगत करुन निवेदन दिले होते.वेकोलि लालपेठ क्षेत्र चंद्रपूरची वसाहत नांदगाव (पोडे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ग्रामपंचायतीला वेकोलिकडून कर रुपात ४९ टक्केच कर देण्यात येतो व उर्वरित कर वसाहतीतील नाल्या, दिवाबत्ती, पाणी, कचराकुंडी व सफाईसाठी वेकोलि प्रशासन खर्च करते. मात्र कर स्वरुपात ग्रामपंचायतीला देण्यात न येणाऱ्या निधीतून वेकोलिने कुठलेही काम व सफाई केल्याचे दिसून येत नाही. वेकोलिने वरील समस्यांचे त्वरित निवारण करीत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी केली आहे. (वार्ताहर)आंदोलनाचा इशारावेकोलिने वसाहतीमधील समस्यांची त्वरित सोडवणूक न केल्यास व जंगल छावणी, चेक पोस्ट ते हनुमान मंदिर रस्त्याची डागडुजी करुन रस्ता रुंदीकरण न केल्यास, वेकोलिविरोधात गावकरी तिव्र आंदोलन छेडेल, असा इशारा नांदगाव (पोडे) उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी दिला आहे.