शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:47 IST

तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

ठळक मुद्देवरोरा-चिमूर मार्गालगत पुनर्वसन : वनविभागाकडून कार्यवाही अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असावा, मानवी हस्तक्षेप नसावा याकरिता मागील काही वर्षांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचे इतरत्र पुर्नवसन करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खातोडा, वनली या गावांचे वरोरा तालुक्यातील वनविभागाच्या जागेवर पुर्नवसन करण्यात आले. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि) या गावाचे वरोरा-चिमूर मार्गालगत सालोरा गावानजीक वनविभागाच्या ७०० एकर जागेमध्ये ५२ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कुटुंबियानी होकार दिल्याने वनविभागाने त्यांच्यासाठी पुनर्वसित जागेत घराचे बांधकाम सुरु केले आहे.एका कुटुंबास शेतीकरिता पाच एकर जमीन, घराकरिता दोन हजार स्केअर फूट जागा व पक्के स्लॅबचे घर बांधण्यात येणार आहे. पुनर्वसन वस्ती मध्ये पथदिव्यांसोबतच विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याकरिता सौरउर्जेवरचे पंप बसविण्यात आले आहे. सौर उर्जेचे पथदिवे, दहा घर मिळून एक सौर ऊर्जा पाणी पंप देण्यात आला आहे. प्रत्येक घरावर एक पाण्याची टाकी ठेवली जाणार असून घरात पाणी पुरवठा पाईप लाईन तसेच घरातील विद्युतीकरणही करुन दिले जाणार आहे. यासोबत या पुनर्वसित पळसगाव (शि) गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व शाळेच्या इमारती बांधण्यात आल्या आहे. सध्या पोच व अंतर्गत रस्त्याची कामे जोमात सुरू आहेत.घर तिथे शौचालयनागरिकांना घरे बांधून देत असताना भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधले जाणार आहेत. त्यामुळे गावात स्वच्छ राहण्यास मदत होईल, असा विश्वास वनविभाग व्यक्त करीत आहे.जून- जुलै महिन्यातच पूर्नवसनाची कामे पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जर पावसाळा लवकर सुरु झाल्यास दोन ते महिने कामे होणार नसले तरी डिसेंबर महिन्यात पूर्नवसीत झालेल्या पळसगाव (शि) ये कुटुंब वास्तव्यास येतील.- गजेंद्र नरवने, उपसंचालक (बफर)ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर